News Flash

#BottleCapChallenge: सेलिब्रिटीजने एकदम स्टाइलमध्ये पूर्ण केले चॅलेंज, पाहा व्हिडिओ

कलाकारांचे चॅलेंज स्वीकारतानाचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

सध्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चांगलाच ट्रेण्ड होतोय. हॉलिवूड अभिनेता जेसन स्टॅथमपासून प्रेरित होऊन बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनेही हे आव्हान स्वीकारले होते. आता अक्षय कुमारच्या पाठोपाठ बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील इतर कलाकरांनीही हे आव्हान थोड्या मजेशीरपणे स्वीकारले आहे.

हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्स, अभिनेता टायगर श्रॉफ, कुणाल खेमु, सिद्धार्थ चतुर्वेदी या बॉलिवूड कलाकारांनीदेखील अक्षय कुमार प्रमाणे ‘बॉटल कॅप चॅलेंज’ स्वीकारले आहे. त्यांनी या चॅलेंजचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. टायगने डोळ्यावर पट्टी बांधून हे आव्हान स्वीकारले आहे तर कुणाल खेमू आणि रायनने थोड्या मजेशीर अंदाजात हे चॅलेंज स्वीकारसे आहे.

‘बॉटल कॅप चॅलेंज’मध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचे झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. असे करताना ती बॉटल खाली पडली नाही पाहिजे. अक्षय कुमारने हे चॅलेंज पूर्ण केले आहे.

कुणाला खेमूने हे चॅलेंज मजेशीर अंदाजात स्वीकारले असल्याचे पाहाला मिळते.

दरम्यान हॉलिवूड अभिनेता रायन रेनॉल्ड्सने देखील हे चॅलेंज स्वीकारले आहे. परंतु रॅनचा प्रयत्न कसा फसतो हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

अक्षय कुमारने हा व्हिडीओ शेअर करतना ‘हे करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही. यातील जे व्हिडीओ मला आवडतील जे मी रिट्विट आणि रिपोस्ट नक्की करेन. तुम्हीसुद्धा हे आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता,’ असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 10:23 am

Web Title: celebrity bottle cup challenge avb 95
Next Stories
1 Video : सुष्मिता सेन आणि रोहमन यांनी केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण
2 ‘कबीर सिंग’चे बॉक्स ऑफिसवर द्विशतक
3 आशा भोसले यांना स्वामीभूषण पुरस्कार
Just Now!
X