News Flash

प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा : ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर दिग्गजांची हजेरी

'या' दिवशी रंगणार हा खास भाग

गेल्या सहा वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. आतापर्यंत या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं.त्याचसोबत या मंच्याच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे लवकरच या कार्यक्रमामध्ये दिग्गज व्यक्ती पाहायला मिळणार आहेत.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात येत्या आठवड्यात प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा साजरा केला जाणार आहे. या भागामध्ये आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि डिसले गुरुजी अशी दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.

विविध क्षेत्रात कार्य करणारी ही दिग्गजमंडळी या कार्यक्रमात प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. सोबतच त्यांचे अनुभवदेखील शेअर करणार आहेत. येत्या २५ ते २७ जानेवारी दरम्यान हा विशेष भाग रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 5:09 pm

Web Title: chala hawa yeudya special episode vishwas nagare patil dr tatyarao lahane adv ujjwal nikam ssj 93
Next Stories
1 ‘वफाएं मेरी याद करोगी’ नुसरत जहाँ यांच्या पतीची इन्स्टा पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
2 महाराष्ट्राला खळखळून हसवणारे कलाकार ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर; मनमोकळ्या गप्पा अन् बरंच काही
3 कडेकोट बंदोबस्तात पार पडणार वरुण-नताशाचा लग्नसोहळा; मोबाईल फोन नेण्यासही बंदी
Just Now!
X