News Flash

बुद्धावरील चित्रपटामुळे जनजीवनात बदल – गगन मलिक

माहिती चित्रपटात सिद्धार्थ गौतमाची भूमिका साकारणारे अभिनेता गगन मलिक यांनी दिली

अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांचे आजवर कधीही जगासमोर न आलेले वास्तव ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ या चित्रपटात मांडण्यात आले. मूळ चित्रपट विदेशातील बौद्ध राष्ट्रांत चांगलाच गाजला. या चित्रपटामुळे अनेक लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला, अशी माहिती चित्रपटात सिद्धार्थ गौतमाची भूमिका साकारणारे अभिनेता गगन मलिक यांनी दिली. गगन मलिक यांच्यासह ‘महामाया’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंशू मलिक हिने शुक्रवारी येथे पत्रकारांसमोर या चित्रपटाबद्दलचे आपले अनुभवकथन केले. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, उत्तर कोरिया, व्हिएतनाम आणि इतर बौद्ध राष्ट्रात तुफान गाजलेल्या व संयुक्त राष्ट्रसंघाने गौरविलेला ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट १४ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात प्रदíशत झाला. वैभवी आयुष्य जगणारे युवराज सिद्धार्थ गृहत्याग करून भगवान गौतम बुद्ध कसे बनले, याचे भावनिक चित्रण या चित्रपटात असल्याने प्रेक्षकांना भगवान गौतम बुद्धाचे पूर्वायुष्य चित्रपटरूपात पाहायला मिळणार आहे. राज्य शासनाने हा चित्रपट करमुक्त केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. रामायण व संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेत श्रीरामाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गगन मलिक याने युवराज सिद्धार्थ गौतमाची भूमिका वठविली आहे. सोबत बिग बॉस सिजन-८ चा विजेता गौतम गुलाटी याने देवदत्त, अभिनेत्री आचल सिंह हिने यशोधरा, तर अंशू मलिक या अभिनेत्रीने महामायाची भूमिका साकारली. मूळ सिंहली भाषेतील हा चित्रपट असून श्रीलंकेचे दिग्दर्शक समन विरामन यांनी त्याची निर्मिती केल्याची माहिती यावेळी अभिनेता मलिक यांनी दिली. महाराष्ट्रातील रसिकांना हा चित्रपट पाहता यावा म्हणून नितीन गजभिये व गगन मलिक यांनी हा चित्रपट हिंदी भाषेत प्रदíशत केला आहे. या चित्रपटामुळे श्रीलंकेतील हजारो लोकांच्या जीवनात बदल घडून आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 5:03 am

Web Title: changes in social life due to film on buddha say gagan malik
Next Stories
1 करिनाने फवाद खानकडे केले दुर्लक्ष
2 ..म्हणून लांबणीवर गेला मलायका आणि अरबाजचा घटस्फोट?
3 ‘पद्मावती’मध्ये दीपिका-रणवीरदरम्यान ही अभिनेत्री निर्माण करणार दुरावा
Just Now!
X