News Flash

Top 5: बॉलिवूडचे हे कोट्याधीश स्टार आजही वापरतात स्वस्त गाडी

काही स्टार त्यांच्या लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहतात

बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार आहेत जे आज त्यांच्या मेहनतीने कोट्याधीश झाले आहेत. काही स्टार त्यांच्या लाइफस्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहतात. त्यांचे महागडे घर, गाड्या, कपडे हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडमध्ये असेही काही स्टार आहेत जे या सगळ्यापासून फार लांब राहणं पसंत करतात. त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगायला आवडते. याचा अर्थ असा मुळीच नाही की या स्टारकडे महागड्या गाड्या नाहीत किंवा घर नाही. फक्त त्यांना त्या सर्व गोष्टी मिरवण्यात फारसे स्वारस्य नसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांची नावं सांगणार आहोत जे कोट्याधीश असून आजही साध्या गाड्यांमधून फिरणंच पसंत करतात.

जॉन अब्राहम-
‘धूम’ सिनेमापासून जॉनचं गाड्यांसाठी असलेलं प्रेम साऱ्यांनाच माहित आहे. जॉनकडे अनेक महागड्या बाईक आणि गाड्या आहेत. असे असतानाही जॉनला मारुती कंपनीची मॉडिफाइड जिप्सीमधून फिरणेच पसंत आहे. त्याच्या या गाडीची किंमत ५ लाख रुपये सुरू होते.

jackie shroff जॅकी श्रॉफ

जैकी श्रॉफ-
बॉलिवूडचा हॅण्डसम हिरो जॅकी श्रॉफ यांनाही महागड्या गाड्यांमधून फिरण्याची फारशी आवड नाही. ते आजही टोयोटा इनोवामधून फिरणंच पसंत करतात. या गाडीची किंमत साधारणपणे १२ ते २० लाख रुपये आहे.

नाना पाटेकर-
पाटेकर यांना नेहमीच सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगायला आवडते. त्यांच्या याच आवडीमुळे ते आजही महिंद्राच्या मेजर कारमधून फिरतात. या गाडीची निर्मिती करणं भारतात केव्हाचं बंद झाले आहे.

anil kapoor अनिल कपूर

अनिल कपूर-
बॉलिवूडमधील कोट्यवधी लोकांमध्ये अनिलचे नाव आवर्जुन घेता येईल असे आहे. त्याच्याकडे २ कोटींची मर्सिडीज एस क्लास, १.६ कोटींची ऑडी ए८ आणि लॅम्बोर्गिनी यासारख्या एकाहून एक सरस गाड्या आहेत. एवढ्या महागड्या गाड्या असूनही अनि मात्र त्याच्या १२ लाखांच्या टाटा सफारीमधूनच फिरतो.

disha patani दिशा पटानी

दिशा पाटनी-
‘बागी २’ ची अभिनेत्री दिशाही महागड्या गाडीतून फिरताना दिसत नाही. दिशाकडे शेवरोलेट क्रुझ आहे. अनेकदा तिला या गाडीतून फिरताना पाहण्यात आले आहे. या गाडीची किंमत ८ लाख ते १२ लाख रुपयांदरम्यान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 5:23 pm

Web Title: cheapest car of bollywood celebrities
Next Stories
1 लग्नाचं प्रपोजल देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीला रवीना म्हणाली…
2 Kaala Movie: १० वर्षांपासून या जपानी जोडप्याची रजनीकांतसाठी भारताला ‘स्पेशल विझिट’
3 Kaala Movie : पहिल्याच दिवशी ‘काला’ची पायरेटेड कॉपी लीक, चाहत्यांची सटकली
Just Now!
X