गायक आणि अभिनेत्री सोफी चौधरीचा नुकताच साखरपुडा झाला. सोफीने ट्विटरवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिच्या हातात हिऱ्याची अंगठी आहे. या फोटोमध्ये ती एका व्यक्तिबरोबर दिसत आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा मात्र दिसत नाहीए. ट्विटरवर तिने हा फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच अनेक कलाकारांनी तिला याबद्दल शुभेच्छा द्यायलाही सुरुवात केली. बिपाशा बासू आणि नेहा धुपिया यांनी ट्विटरवर तिला शुभेच्छा दिल्या.
पण या फोटोमध्ये दिसणारं तिचं हसूच सगळं काही सांगून जातंय. त्यामुळे फोटोमधली व्यक्तीच तिच्या या हसूचं कारण आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोच्या खाली तिने, ‘आता वाट पाहू शकत नाही,’ असा संदेशही लिहिला आहे. पण आता ती कोणत्या गोष्टीची वाट पाहू नाही शकत हे मात्र माहित नाही. पण, लग्नासाठीच ती उतावीळ असेल असेच वाटते. त्यामुळे काही दिवसात सोफी चौधरीचे लग्न झाले अशी बातमी कानावर आली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
काही दिवसांपूर्वी बीग बॉस फेम मंदना करीमी हिनेही तिचा साखरपुड्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यात आता सोफीही लग्नाच्या बंधनात अडकायला तयार झाली आहे.