बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो सुरू झाला तेव्हा या शोकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. पण आता मात्र हा शो अनेक कारणांमुळे चर्चेत राहत आहे. सध्या बिग बॉसचं हे घर नव्या कारणामुळे वादात अडकलं आहे. हे कारण उषा नाडकर्णी नसून राजेश श्रुंगारपूरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील प्रेम हे आहेत. बिग बॉसच्या घरात राजेश आणि रेशमने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ऋषिकेश बळवंत देशमुख यांनी नाशिक येथील पंचवटी पोलिस ठाण्यात बिग बॉसविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी रेशम आणि राजेशचे संवाद आणि वर्तन हे मर्यादांचं उल्लंघन करणार असल्याचं म्हटलं आहे. १४ मे रोजी चॅनल सर्फिंग करताना बिग बॉसचा शो सुरू होता. शोमध्ये नक्की काय सुरू आहे हे पाहण्यासाठी बिग बॉस पाहायला सुरूवात केली. पण कुटुंबासोबत हा शो पाहत असताना राजेश- रेशमचे आक्षेपार्ह वर्तन आणि संवाद सुरू झाले. दोघेही विवाहित आहेत. त्यांच्या अशावर्तनामुळे विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घातले जाते असा आरोप ऋषिकेश यांनी केला आहे.

दाखवण्यात आलेल्या भागाची चौकशी व्हावी आणि कलर्स वाहिनीचे संचालक आणि निर्माते तसेच दोन्ही कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऋषिकेश यांनी केली आहे. ऋषिकेश देशमुख हे सध्या कायद्याचं शिक्षण घेत असून, याप्रकरणी त्यांनी थेट पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.