News Flash

“रणवीर दिवसातले २० तास झोपलेला असतो, त्यामुळे…”; दीपिकाने सांगितली क्वारंटाइनची कथा

दीपिकाने मुलाखतीमध्ये व्यक्त केली एक इच्छा

रणवीर आणि दीपिका

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. १४ एप्रिलपर्यंत असणाऱ्या या लॉकडाउनचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. चित्रपट आणि मालिकांचे चित्रिकरणही थांबवण्यात आलं असल्याने अनेक कलाकार आपल्या घरीच आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. हे कलाकार घरी असताना म्हणजेच होम क्वारंटाइन असताना करत असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती त्यांच्या चाहत्यांना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून देत असतात. अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग क्वारंटाइनमध्ये काय करतो त्याबद्दलची माहिती दिली आहे.

दीपिका आणि रणवीरला त्यांचे चाहते दिपवीर या नावाने हाक मारतात. १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी या दोघांचे लग्न झालं. त्यानंतर हे दोघेही आपआपल्या कामात व्यस्त झाले. अनेक ठिकाणी हे दोघे आपआपल्या वेळापत्रकाप्रमाणे चित्रिकरणासाठी, पुरस्कार सोहळ्यांसाठी फिरताना दिसले. अगदीच कधीतरी हे दोघे एकत्र दिसून आले. त्यामुळेच आता या लॉकडाउनच्या निमित्ताने दोघांना एकमेकांबरोबर बराच वेळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे. हे दोघेही होम क्वारंटाइनमध्ये काय करत आहेत याबद्दलची माहिती ते आपल्या चाहत्यांना इन्स्ताग्रामवरुन देत आहेत. अनेकदा हे दोघे त्यांच्या सकाळच्या व्यायामाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात.

 

View this post on Instagram

 

Season 1:Episode 4 Two Two…ChaChaCha Productivity in the time of COVID-19! #exercise

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाने काही दिवसांपूर्वी राजीव मसंदला हँगआऊटवरुन मुलाखत दिली. त्यावेळी तिने रणवीर क्वारंटाइनदरम्यान काय करतो हे सांगताना, ‘अशावेळी एकत्र राहण्यासाठी रणवीर हा एक सर्वोत्तम जोडीदार आहे,” असं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Double the Endorphin-rush when She’s around! #homegymbuddies my #mondaymotivation @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिकाला या मुलाखतीमध्ये तुझा आणि रणवीरचा क्वारंटाइनदरम्यानचा शेड्यूल कसा असतो अशा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना दीपिकाने, “अशा प्रसंगी सोबत राहण्यासाठी रणवीर हा सर्वात उत्तम व्यक्ती आहे. तो दिवसातले २० तास झोपलेला असतो. त्यामुळे मला हव्या त्या गोष्टी घरात करता येतात,” असं उत्तर दिलं. “ज्या चार तासांमध्ये तो जागा असतो तेव्हा आम्ही एकत्र चित्रपट बघतो, जेवतो, गप्पा मारतो, व्यायाम करतो. अशावेळी त्याच्यासारखी व्यक्ती बरोबर असणं खरचं आनंददायी आहे. त्याच्या काहीही मागण्या नसतात, कटकट नसते. तो एकदम निवांत असतो,” असं दिपिकाने सांगितलं.

नक्की पाहा>> Video: बेडरुमसंदर्भातील प्रश्नावर रणवीरने असं काही उत्तर दिलं की दीपिकाही लाजली

याच मुलाखतीमध्ये पुढे बोलताना क्वारंटाइनच्या कळात आपल्याला भारतीय पद्धतीचे जेवण बनवायला शिकायचं आहे असंही दिपिकाने सांगितलं. “तो (रणवीर) कधीच स्वयंपाक घरात जात नाही. मला पाश्चिमात्य, इटालीयन आणि कॉन्टीनेंटल पदार्थ बनवात येतात. मात्र मला कुकरची भीती वाटते. मला या काळामध्ये भारतीय पद्धतीचं जेवण बनवायला शिकायचं आहे. मला कोंथबीर, पुदीना आणि बेसन पीठ आणि सध्या पिठातला फरकही समजून घ्यायचा आहे,” असं दीपिकाने हसत हसतच सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Ek toh gaya ab tera kya hoga, Bajirao?

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिका आणि रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटामध्ये एकत्र दिसणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाने १९८३ मध्ये जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित या चित्रपटामध्ये रणवीरने तत्कालीन भारतीय कर्णधार कपील देव यांची भूमिका साकारली आहे. तर त्याच्या रियल लाइफ पत्नी चित्रपटामध्येही पत्नीच्याच भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 12:31 pm

Web Title: coronavirus deepika padukone shares husband ranveer singhs lockdown routine says he sleeps for 20 hours scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ११ बोटांमुळे हृतिक आला अडचणीत; पियानो वाजवणं झालं कठीण
2 रामायण प्रदर्शित होताच स्वारा भास्कर झाली ट्रोल, केली मंथराशी तुलना
3 Coronavirus : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर, म्हणाली…
Just Now!
X