बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने करोना व्हायरससंबंधी माहिती देणाऱ्या आरोग्य सेतू अ‍ॅपची माहिती देणारा एक व्हिडीओ शूट केला असून त्याचं प्रमोशन केलं आहे. यासोबतच त्याने आरोग्य सेतू अ‍ॅप सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. अजय देवगणने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “करोना व्हायरसशी लढा देण्याकरता प्रत्येक भारतीयासाठी पर्सनल बॉडीगार्डची निर्मिती केल्याबद्दल आभार. सेतू माझा बॉडीगार्ड आहे आणि तुमचाही”. अजय देवगणने यावेळी लोकांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करण्याचंही आव्हान केलं आहे.

व्हिडीओमध्ये अजय देवगण डबल रोलमध्ये दिसत आहे. या व्हिडीओत अजय देवगण आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे होणारे फायदे सांगत असून लोकांनाही त्याचा वापर करण्याचं आवाहन करत आहे.

अजय देवगण सोशल मीडियाच्या माध्यमातू सतत लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत असून जनजागृतीदेखील करत आहे. याआधी त्याने चाहत्यांना करोनाची लागण झालेल्यांसाठी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याने ट्विट करताना लिहिलं होतं की, “जर तुम्ही करोनावर मात केली असेल तर तम्ही खऱे योद्धा आहात. या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी आपल्याला अशा अनेक योद्धे हवे आहेत. कृपया रक्तदान करा. जेणेकरुन ज्यांची प्रकृती गंभीर आहे ते लवकर बरे होतील”.

डॉक्टरावंर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी अजयने संताप व्यक्त केली होता. निराधार गोष्टींच्या आधारे सुशिक्ष्त लोक डॉक्टरांवर हल्ला करत असल्याच्या बातम्या वाचून संताप होत असल्याचं त्याने म्हटलं होतं.