21 October 2018

News Flash

राज्य सरकारतर्फे कान्स साठी तीन मराठी चित्रपटांची निवड

सायकल, टेक केअर गुड नाईट आणि दशक्रिया चित्रपटाची कान्ससाठी निवड

'दशक्रिया' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रीय पुरस्कारांवर छाप सोडल्यानंतर आता सायकल आणि दशक्रिया कान्स चित्रपट महोत्सव गाजवण्यास सज्ज झाले आहे. कान्स चित्रपट महोत्सवासाठी सायकल, टेक केअर गुड नाईट आणि दशक्रिया या चित्रपटांची निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.  १७ मे ते २८ मे २०१७ या कालावधीत होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टीवल, फिल्म मार्केट २०१७ साठी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

कान्स साठी पाठवावयाच्या तीन चित्रपटांची निवड करण्यासाठी गठीत समिती सदस्यांनी १६ चित्रपटांमधून ३ चित्रपटांची निवड केली आहे.  निवड करण्यात आलेले तीन चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत सायकल, टेक केअर गुड नाईट, दशक्रिया याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केली. कान्स साठी निवड करण्यात आलेले ३ चित्रपटांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी असे एकूण ६ प्रतिनिधी महोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहेत. नुकताच ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये दशक्रियाला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार दिला आहे.

First Published on April 8, 2017 10:30 pm

Web Title: dashkriya cycle take care good night cannes film festival