News Flash

Video : सई ताम्हणकरच्या पहिल्या वेब सीरिजचा टीझर पाहिलात का?

एका चाहत्याचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे.

date with sai
'डेट विथ सई'चा टीझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर लवकरच वेब विश्वात पदार्पण करत आहे. दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारखे मराठी चित्रपट तर हंटर, गजनी, लव्ह सोनिया यांसारख्या हिंदी चित्रपटांनंतर आता सईने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळवला आहे. ‘डेट विथ सई’ ही नवीन सीरिज ZEE5 लवकरच येणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

थरारशैलीच्या सीरिजमध्ये सई पहिल्यांदाच काम करतेय. त्यामुळे ही वेब सीरिज एक वेगळा अनुभव असल्याचं ती सांगते. एका चाहत्याचं तुमच्यावरच प्रेम कसं जीवघेणंही ठरू शकतं, त्याची अनुभूती देणारी ही वेबसीरिज आहे. सईचा एक चाहता कशाप्रकारे तिच्यावर सतत नजर ठेवतो आणि तिला कानोकान खबर न लागता कशाप्रकारे तिच्यावर चित्रपट निर्मिती करतो यावर ही वेब सीरिज आधारित आहे. त्या चित्रपट निर्मितीसाठी हा चाहता तिच्या आयुष्यात एकेक गोष्टी घडून आणतो. आता जेव्हा सईला या चाहत्याबद्दल समजतं तेव्हा काय घडतं हे या वेब सीरिजमधून पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : छोट्या पडद्यावरही लगीनघाई; ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेत श्रुती- कार्तिक होणार विवाहबद्ध 

येत्या ५ डिसेंबरपासून ZEE5 ही सीरिज प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 2:24 pm

Web Title: date with sai teaser released premiering 5th december only on zee5 india
Next Stories
1 चाहत्यांसोबत साजरा झाला अमृताचा वाढदिवस
2 घटस्फोटानंतर वर्षभराच्या आतच ‘रोडिज’ फेम रघु चढणार बोहल्यावर
3 छोट्या पडद्यावरही लगीनघाई; ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेत श्रुती- कार्तिक होणार विवाहबद्ध
Just Now!
X