24 February 2021

News Flash

..म्हणून दीपिका- रणवीर इन्स्टाग्रामवर ठरले नंबर वन!

दीपिका आणि रणवीरची जोडी १०० गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रस्थानी पोहोचली आहे.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, ranveer, deepika

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाची तारीख जाहीर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा होत्या. अखेर दीप- वीरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपवर दीपिका- रणवीरची लोकप्रियता प्रचंड आहे आणि याचमुळे ही जोडी इन्स्टाग्रामवर नंबर वन ठरली आहे.

दीपिका आणि रणवीरची जोडी १०० गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रस्थानी पोहोचली आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेंड्स इंडियाद्वारे प्रमाणित आणि संशोधित ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. बॉलिवूडमधील या बहुचर्चित जोडीने लग्नाची तारीख जाहीर करताच इन्स्टाग्रामवर दीप-वीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल याविषयी सांगतात, “दीपिका-रणवीरने इंस्टाग्रावरून आपल्या लग्नाची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब-याच लोकांनी ही पोस्ट वाचली, लाइक आणि शेअर केली. ज्यामुळे त्यांच्या रँकिंगवर बराच फरक पडला आहे.”

अश्वनी कौल पुढे म्हणतात, “आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे.”

रणवीरसोबतच अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इन्स्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच, दीपिकासोबत प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडिस आणि सोनम कपूर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 2:11 pm

Web Title: deepika padukone ranveer singh became number one on instagram know the reason here
Next Stories
1 ‘फॅशन’ चा सिक्वल येणार
2 Video बंगाली गाण्यामुळे चिडले आसामी, शानवर फेकला कागदाचा बोळा
3 #KedarnathTeaser : केदारनाथ प्रलयावर आधारित साराच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
Just Now!
X