23 October 2020

News Flash

‘xXx’ च्या क्लायमॅक्स सीनसाठी दीपिकाला अत्याधुनिक रायफल्सचे प्रशिक्षण

दीपिकाच्या प्रशिक्षणासाठी लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.

Deepika Padukone : गेल्या सहा आठवड्यांपासून दीपिकाचे शस्सास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. दीपिका या चित्रपटात सेरेना या शिकारी मुलीची भूमिका साकारत असून तिला यासाठी काही अवघड अॅक्शन सीन्स करावे लागणार आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या टोरान्टो येथे XXX: Return of Xander Cage या हॉलिवूडपटाचे चित्रीकरण करत आहे. थोड्याच दिवसांत या चित्रपटातील महत्त्वपूर्ण क्लायमॅक्स सीन चित्रीत होणार असून त्यासाठी दीपिका सध्या अत्याधुनिक बनावटीच्या रायफल्स हाताळण्याचे प्रशिक्षण घेत आहे. दीपिकाला या रायफल्स कशा चालवतात हे शिकवण्यासाठी माईक या लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या सहा आठवड्यांपासून दीपिकाचे शस्सास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. दीपिका या चित्रपटात सेरेना या शिकारी मुलीची भूमिका साकारत असून तिला यासाठी काही अवघड अॅक्शन सीन्स करावे लागणार आहेत. त्यासाठी दीपिका व्यायामशाळेत कसून सरावही करत आहे. दीपिकाने ‘xXx’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकराणासाठी ५ फेब्रुवारीपासून सुरूवात केली आहे. सध्या सेलिब्रेटी ट्रेनर यास्मीन कराचीवालाकडे तिचे ट्रेनिंग सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2016 3:13 pm

Web Title: deepika padukone to sport real gun in xxx the return of the xander cage
Next Stories
1 कलाकाराने समाजाभिमुख असावे- शौनक अभिषेकी
2 सुपरहिरो पर्वाचा नवा देखणा अध्याय
3 ‘बागी’मधील धारानृत्यामुळे रेल्वेवर पैशांचा पाऊस
Just Now!
X