हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अशी ओळख असणारे अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी ‘शमिताभ’ या चित्रपटामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. वयाची सत्तरी उलटली असली, तरी अमिताभ यांच्या भूमिकांमधील वैविध्य आणि पडद्यावर अतिशय तडफेने एखादी भूमिका साकारण्याची त्यांची हातोटी आजही कौतुकाचा विषय आहे. आज ते यशाच्या शिखरावर असले, तरी भूतकाळात ज्या चित्रपटांमुळे त्यांनी यशाची चव चाखली, त्यांच्याविषयी अमिताभ यांना आजही तितकीच आत्मियता आहे. सलीम-जावेद यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ‘दिवार’ हा त्यापैकीच एक चित्रपट. हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटाला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपटाच्या अनेक आठवणी जागवताना अमिताभ यांनी ‘दिवार’सारखी एक परिपूर्ण कथा लिहिल्याबद्दल सलीम-जावेद यांचे आभार मानले.


यश चोप्रा यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटातील विजय वर्मा या व्यक्तिरेखेने अमिताभ यांना खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ची ओळख मिळवून दिली. चित्रपटातील अमिताभ आणि शशी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील काही लोकप्रिय संवाद खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी.

deewar-embed-759

या चित्रपटातील काही लोकप्रिय संवाद खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी

आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास….. मेरे पास माँ है!

उफ! तुम्हारे ये उसूल, तुम्हारे आदर्श!

खुश तो बहोत होगे तुम आज!

जाओ पहले तुम उस आदमी का साईन लेकर आओ जिस्ने मेरे हाथ पे ये लिखा दिया था…. फिर तुम जहाँ कहोगे मेरे भाई… वहाँ साईन कर दुंगा…

मै आज भी फेके हुएँ पैसे नही उठाता…