News Flash

देवमाणूस मालिकेचे १०० भाग पूर्ण; सेटवर सेलिब्रेशन

‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा ओलांडला आहे. ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय कारण या मालिकेतील ‘सरू आजी, डिम्पल, टोण्या, बज्या, विजय,नाम्या, मंजुळा आणि डॉ. अजित कुमार देव’ ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत.

देवमाणूस ही मालिका त्यातली पात्रे आणि रंजक, रहस्यमयी कथानकामुळे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रत्येक एपिसोडगणिक मालिकेची उत्कंठा वाढत आहे. येत्या काळात मालिका आणखी रंगत जाणार यात शंका नाही.

‘देवमाणूस’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 10:52 am

Web Title: devmanus marathi serial completed its 100 episodes ssv 92
Next Stories
1 नवविवाहित गौहरला विमानात अचानक भेटला एक्स बॉयफ्रेंड, कुशल म्हणाला..
2 हे काय? या मराठी अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला
3 ‘सँडविच फॉरेव्‍हर’मध्‍ये दिसणार अतुल कुलकर्णीची विनोदी शैली
Just Now!
X