News Flash

‘देवमाणूस’ मालिकेत अजून एक नवीन चेहरा

मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे.

दिव्या सिंग भर लग्नाच्या मांडवातून देविसिंगची वरात थेट पोलीस स्टेशनकडे नेते

झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेतील विलक्षण वळण पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. एसीपी दिव्या सिंग भर लग्नाच्या मांडवातून देवी सिंगची वरात थेट पोलीस स्टेशनकडे नेते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याकडे दिव्याचं लक्ष आहे, पण अजितकुमार देखील हार मानणारा नाही आहे. अजितकुमार सध्या कोर्टात स्वतःची बाजू स्वतःच मांडतोय. दिव्या अजितकुमारच्या विरोधातले सगळे पुरावे कोर्टातच सादर करणार आहे. अशात आता मालिकेत देवी सिंगला तुरुंगात धाडण्यासाठी सरकारी वकील म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एण्ट्री झाली आहे. ही वकील देवी सिंगला खडी फोडायला पाठवणार आहे आणि त्यासाठी कोर्टात त्याच्यासोबत वादविवाद करताना दिसेल.

अभिनेत्री सोनाली पाटील ही सरकारी वकीलाची भूमिका साकारतेय. एवढंच नाही तर सोनाली पाटीलनं सोशल मीडियावरही काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘मी येतेय पुन्हा एका नव्या रूपात…’ आता ही सरकारी वकील देवी सिंगला शिक्षा करून देण्यात यशस्वी होईल कि ती देखील देवी सिंगची शिकार होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

आणखी वाचा : यामी गौतम पाठोपाठ ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)

या नवीन भूमिकेबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “देवमाणूस या मालिकेत आता एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे आणि अशावेळी माझी या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेतून एण्ट्री झाली आहे याचा मला खूप आनंद आहे. आर्या ही खूप धाडसी आणि महत्वाकांक्षी आहे. ती देवी सिंग प्रकरण कशाप्रकारे हाताळते हे पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 4:25 pm

Web Title: devmanus serial update new entry avb 95
Next Stories
1 कन्फर्म! विकी कौशल आणि कतरिना कैफ रिलेशनशीपमध्येच…; हर्षवर्धन कपूरचा शिक्कामोर्तब
2 निया शर्मा आणि देवोलिनामधील ‘तू तू मै मै’वर पडला पडदा; दोघींनी मागितली माफी
3 या अभिनेत्रीला ओळखलंत का?
Just Now!
X