मराठीत बऱ्याच काळानंतर मल्टिस्टारर चित्रपट उत्तम कथानकासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’ हा राजकीय कथानकावर आधारित चित्रपट पुढच्या वर्षी ३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी लेखक क्षितीज पटवर्धन, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि निर्माते पुण्यातील काही गावांमध्ये गेले. या गावांतील राजकीय परिस्थिती काय आहे, सरपंचपदाची निवडणूक कशी असते याचा अभ्यास ‘धुरळा’च्या टीमने केला. ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांना पुण्यात ‘पॉवर’ पॉलिटिक्स जाणवलं की ‘पवार’ पॉलिटिक्स, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी पाहा खालील व्हिडीओ..

‘धुरळा’ चित्रपटात अंकुश चौधरी, प्रसाद ओक, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.