News Flash

मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन

समीरने चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर करत दिली माहिती.

सोशल मीडिया पोस्टद्वारे समीरने या चित्रपटाची घोषणा केली आहे.

दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. त्याने आजवर अनेक चित्रपट केले आहेत. आता समीर विद्वांस बॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक करणार आहे. तो अभिनेता कार्तिक आर्यनसोबत काम करणार आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे समीरने या चित्रपटाची घोषणा केली आहे.

समीर विद्वांसचा लवकरच ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा समीरने नुकताच ट्विटरद्वारे केली आहे. ‘एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या’ असे समीरने ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच समीरने चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे.

आणखी वाचा : ‘एकाचे कर्म, दुसऱ्याचे भविष्य’, समांतर २चा ट्रेलर प्रदर्शित

समीरच्या या आगामी चित्रपटाचे नाव ‘सत्यनारायण की कथा’ असे असून या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समीरने ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच समीरची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. आता १ जुलै रोजी या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडीत, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 12:57 pm

Web Title: dhurla director sameer vidwans upcoming movie satyanaran ki katha with kartik aryan avb 95
Next Stories
1 …म्हणून शाहरुख खान अक्षय कुमारसोबत काम करत नाही; किंग खानने केला होता खुलासा
2 “इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेलं गुलामगिरीचं नाव”; कंगना रणौतने देशाच्या नावावरून केलं मोठं विधान
3 मासिक पाळी आणि १०२ ताप, रवीनाने सांगितला ‘टिप टिप बरसा पाणी’च्या चित्रीकरणाचा अनुभव
Just Now!
X