News Flash

#पुन्हानिवडणूक?चे रहस्य उलगडलं, ‘धुरळा’चा ट्रेलर प्रदर्शित

सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग चर्चेत होता. मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक बड्या कलाकारांनी ट्विटवर #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले होते. या कलाकारांमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी या कलाकारांचा समावेश होता. त्यांनी हा हॅशटॅग त्यांचा आगामी चित्रपट ‘धुरळा’चे प्रमोशन करण्यासाठी वापरला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ट्रेलर पाहता सध्याच्या राजकारणावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. तसेच राजकारणात कधी काय होईल याची कल्पना कधीच कुणाला नसते असे वास्तविक दृश्य चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. गावच्या मातीत मुरलेले राजकारण आणि सत्तेच्या खेळात एकमेकांचा पाय खेचताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सर्व ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

‘धुरळा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांसने केले असून चित्रपटात अल्का कुबल, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अमेय वाघ, उमेश कुलकर्णी ही तगडी स्टार कास्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ३ जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 3:12 pm

Web Title: dhurla trailer is out avb 95
Next Stories
1 बिग बॉसमधील निवृत्तीच्या प्रश्नावर सलमान म्हणाला…
2 Ragini MMS Returns 2 Trailer : इंटीमेट सीन देणं झालं होतं कठीण, अभिनेत्रीचा खुलासा
3 सुपर व्हिलन थेनॉसमुळे डोनाल्ड ट्रम्प झाले ट्रोल
Just Now!
X