मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकाम तोडलं आहे. पालिकेच्या या कारवाईवर अभिनेत्री दिया मिर्झा हिने संताप व्यक्त केला आहे. जेव्हा हे अनधिकृत बांधकाम उभारलं जात होतं तेव्हा ही मंडळी कुठे होती, असा सवाल तिने केला आहे.

ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री संजना गलरानी अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

“तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

“कंगनाच्या पाकव्याप्त काश्मीर या विधानाशी मी सहमत नाही. पण मुंबई महापालिकेने केलेली ही कारवाई चुकीची आहे. आत्ताच का? न सांगता अचानक कारवाई का केली? जेव्हा हे अनधिकृत बांधकाम उभारलं जात होतं तेव्हा महापालिकेचे अधिकारी कुठे होते?” अशा आशयाचं ट्विट करुन दिया मिर्झाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

महापालिकेकडून कंगनाला जुहू येथील कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती. उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती. पण कंगनाकडून कोणतंही उत्तर न दिल्याने आज सकाळी पालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेकडून कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला. पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट करण्यात आले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचंही तिने म्हटलं आहे.