करोनाचं संकट ओढवलेलं असलं तरी देशात शिस्तबद्धपणे ७४वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. लाल किल्ल्यासह देशात ठिकठिकाणी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. त्याचबरोबर सोशल मीडियातून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाचाही वर्षाव होतोय. ७४व्या स्वातंत्र्यदिनी ‘धुरळा’चे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी देशातील लोकशाही आणि टीका करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त समीर विद्वांस यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी देशातील संस्था आणि लोकप्रतिनिधींवरील टीकेसंदर्भात भाष्य केलं आहे. “मतंमतांतर असणार. त्यावर चर्चा व्हावीच. पण लोकांचं राज्य यावं म्हणून जर लोकांनीच लोकांसाठी एक व्यवस्था निर्माण केली. ती सांभाळायला प्रतिनिधी, संस्था निर्माण केल्या, तर मग कुठलीही व्यवस्था/संस्था/प्रतिनिधींवर टीका करण्याचाही अधिकार नागरिकांना असायला हवा! लोकशाही त्यालाच म्हणणार ना?!,” असा सवाल विद्वांस यांनी उपस्थित केला आहे.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

मुंबईबद्दलही व्यक्त केल्या होत्या भावना

मुंबईविषयीही विद्वांस यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “मुंबईने आम्हा सगळ्यांना खूप काही दिलंय,अजूनही देत्ये, आयुष्यभर देत राहील. मुंबईने जगायला/स्वप्न बघायला शिकवलं, ते पूर्ण करण्याचा मार्ग दाखवला. मुंबई जितकी सगळ्यांना आपल्यात सहज सामावून घेते, मला वाटत नाही जगातलं दुसरं कुठलही शहर हे करू शकेल. मुंबई नुसती कर्मभूमी नाही प्रेम आहे,” असं म्हणाले होते.