News Flash

‘तारक मेहता…’ मध्ये दयाबेन साकारणाच्या चर्चांवर दिव्यांकाने सोडलं मौन, म्हणाली.. “हा शो खूपच…”

दरम्यान दिव्याका लवकरच कलर्स टीव्हीवरील 'खतरो के खिलाडी'च्या ११ व्या पर्वात झळकणार आहे.

(File Photo/Divyanka Tripathi)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी गेल्या काही दिवसांपासून एका कारणामुळे चर्चेत आहे. दिव्यांका लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची पत्नी दयाबेनच्या भूमिकेत झळकणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता या चर्चांवर दिव्यांकाने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे.

दिव्यांका त्रिपाठी नुकतीच केप टाउनहून मुंबईला परतली आहे. दिव्यांका ‘खतरो के खिलाडी’ या शोच्या शूटिंगासाठी केप टाउनला गेली होती. इथून परतताच दिव्यांकाने ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत झळकणार की नाही यावर प्रितिक्रिया दिली. ती हा शो करत नसल्याचं दिव्यांकाने स्पष्ट केलंय. अशा अफवा पसरवून लोकांमध्ये गोंधळ निर्माण करू नका असं देखील ती म्हणाली.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता…’मधील भिडे मास्तरांच्या सोनूचा व्हिडीओ व्हायरल, समुद्र किनारी निधि भानुशालीची धमाल

टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिव्यांकाने तिच्या ‘खतरो के खिलाडी’ या शोमधील अनुभवांसोबतच इतरही अनेक प्रश्नांवर प्रतिक्रिया दिल्या. दयाबेनची भूमिका साकारणार का? या प्रश्नावर दिव्यांका म्हणाली, “हा एक खूपच मस्त शो आहे. या शोचे अनेक चाहते आहेत. मात्र मला नाही वाटतं मी हा शो करण्यासाठी फारशी उत्सुक आहे. मी एक नवा प्रोजेक्ट आणि नव्या आव्हानांसाठी सध्या उत्सुक असून अशा संधीच्या शोधात आहे.” असं म्हणत दिव्यांकाने ती ‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनची भूमिका साकारणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

हे देखील वाचा: ४० वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर नीना गुप्ता यांना बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली !

दरम्यान दिव्याका लवकरच कलर्स टीव्हीवरील ‘खतरो के खिलाडी’च्या ११ व्या पर्वात झळकणार आहे. दिव्यांकाचा एक प्रोमोदेखील रिलीज करण्यात आलाय. या व्हिडीओत दीपिकने एका मगरीला पकडल्याचं दिसतंय. दीपिकाच्या या प्रोमोला तिच्या चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 4:19 pm

Web Title: divyanka tripathi reacted on palying dayaben in tarak mehata ka oolta chachmah said its rumors kpw 89
Next Stories
1 दीपिका कक्करच्या प्रेग्नसीवर पती शोएब इब्राहिमने केला मोठा खुलासा
2 मीरा राजपूतने दीरासोबतचा क्यूट फोटो केला शेअर; ईशान खट्टर म्हणाला, ‘भाभी डॉल’
3 ‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, नीना गुप्तांनी मुलीला दिला होता सल्ला
Just Now!
X