News Flash

“..म्हणून मी बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही”; या अभिनेत्रीने केला खुलासा

दिव्यांका त्रिपाठीने म्हणाली...

टेलिव्हिजनवरील सोज्वळ आणि निरागस नायिकेच्या भूमिका साकारणाऱ्या अनेक अभिनेत्री सोशल मीडियावर मात्र त्यांचे बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असतात. मालिकांमधील अनेक अभिनेत्री तर बिकिनीतील त्यांचे फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसतात. यात अभिनेत्री हिना खान, निया शर्मा, सुरभि ज्योति, रश्मी देसाई अशा अनेक अभिनेत्रींनी त्यांचे बिकिनीमधील मादक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मात्र लोकप्रियता मिळून देखील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आजवर एकही बिकिनीतील फोटो शेअर केला नाही. टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही तिचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. मात्र आजवर दिव्यांकाने एकही बिकिनीतील फोटो शेअर केला नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने बिकिनीतील फोटो का शेअर केला नाही? याचं कारण सांगितलं आहे.

या मुलाखतीत दिव्यांका म्हणाली, “कारण हे आहे की याबातीत मी लाजाळू आहे. मला स्विमसूट किंवा बिकिनी घालण्यात खूप लाज वाटते. म्हणूनच मी आजवर स्विमिंग शिकले नाही. खरं तर हे चांगलं नाही असं व्हायला नको, पण बिकिनी घालणं मला काहिसं विचित्र वाटतं.” असं ती म्हणाली.

पुढे तिने इतर मुलींचं कौतुक केलं. ती म्हणाली, “बिकिनी घालण्यासाठी मला थोडी हिंमत दाखवावी लागेल. ज्या मुली बिकिनी परिधान करून सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करतात त्या मुली खरचं खूप धाडसी आहेत.”असं ती म्हणाली. “मी कायम थोडी लाजाळू आहे. त्याच्यामागे खरंतर काही लॉजिक नाही. बस्स आधीपासूनच मी लाजरी आहे.” असंही दिव्यांका म्हणाली.

“वडिलांचे पैसे वाया घालवतेय”, ‘यामुळे’ सारा तेंडुलकर झाली ट्रोल

दिव्यांकाने भोपाळमधील ऑल इंडिया रेडिओमधून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती 2004 सालात आलेल्या ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या स्पर्धेत सहभागी झाली. यात अखेरच्या 8 स्पर्धकांमध्ये तिचा समावेश झाला. त्यानंतर दूरदर्शनवरील काही कार्यक्रमात तिने काम केलं. ‘बनू मैं तेरी दुलहन’ या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं. यानंतर तिने अनेत मालिकांमधून मुख्य भूमिका साकारल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 7:18 pm

Web Title: divyanka tripathi reveals why she did not share signal photo in bikini on social media kpw 89
Next Stories
1 प्रियांका चोप्रा लाँच करणार कबीर बेदींचे आत्मचरित्र
2 मनोरंजनाचा डबल धमाका, अजय देवगणचा ‘तान्हाजी’ आता मराठीत पाहण्याची संधी!
3 लॉकडाउनमध्ये देखील मनोरंजनाचा वसा अविरत सुरु राहणार!
Just Now!
X