News Flash

“भयानक डान्सर आहे”, नव्या डान्स व्हिडीओमुळे ‘दिया और बाती’ फेम दीपिका सिंह पुन्हा ट्रोल

दीपिका सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत असते

‘दीया और बाती हम’ या लोकप्रिय मालिकेमुळे अभिनेत्री दीपिका सिंहला खरी ओळख मिळाली. या मालिकेतील दीपिकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. लग्नानंतर दीपिकाने टीव्हीपासून थोडा ब्रेक घेतला असला तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते. मात्र दीपिकाने नुकत्याच शेअर केलेल्या एका डान्स व्हिडीओमुळे चाहत्यांनी तिला ट्रोल केलंय.

मुंबईत तौते वादळाच्या तडाख्यात उन्मळून पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने तसचं फोटोशूट केल्याने दीपिका सिंह चांगलीच ट्रोल झाली होती. यानंतर आता नेटकऱ्यांनी दीपिकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामवर दीपिकाने डान्स व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ती अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या ‘अप’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. दीपिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला असून अनेकांनी दीपिकाच्या डान्सची निंदा केली आहे.

आणखी वाचा: “किती लाजिरवाणं”; वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल

काही चाहत्यांनी दीपिकाच्या डान्सला पसंती दिली असली तरी अनेक चाहत्यांनी तिच्या डान्सला नापसंची दर्शवली आहे. एक युजर म्हणालाय, “ती भयानक डान्सर आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ती भारतीय डान्स उत्तम करते आणि वेस्टर्न डान्स अत्यंत वाईट. पण माहित नाही हा वेस्टर्न डान्स करण्याचा वेडेपणा कुठून येतो.”

deepika-post (photo-instagram@deepikasingh150)

दीपिकाच्या या व्हायरल डान्स व्हिडीओवर एक नेटकरी म्हणाला, “लॉकडाउनमध्ये वेडं लागलंय.” तर दुसरा म्हणाला, ” अभिनय चांगला करते मात्र डान्स नाही.” दीपिकाच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी दीपिका उत्तम अभिनेत्री आहे मात्र ती उत्तम डान्सर नाही अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा: “मला पश्चाताप नाही, मी फक्त…”; ‘त्या’ व्हिडीमुळे ट्रोल झाल्यानंतर दीपिका सिंह म्हणाली…

दरम्यान, वादळाच पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्यानंतर दीपिका ट्रोल झाली होती. यावर एका मुलाखतीत दीपिकाने “मी सकारत्मकता पसरवणं थांबवणार नाही.हे मी माझ्या आनंदासाठी करते. मला त्याचा पश्चाताप नाही मी फक्त सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला.चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते” असं स्पष्टिकरण दिलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 10:13 am

Web Title: diya aur bati hum fame deepika singh trolled after she share new dance video user said horrible dancer kpw 89
Next Stories
1 गायिका नीति मोहनने दिला मुलाला जन्म, पती निहार पांड्याने सोशल मीडियावरुन दिली माहिती
2 “टॉपलेस फोटोशूटमुळे मला भूमिका मिळतील असं नाही”; रायमा सेनने सांगितलं ‘त्या’ फोटोशूटचं कारण
3 ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसणार रिया चक्रवर्ती ? सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर पुन्हा आली चर्चेत
Just Now!
X