21 October 2020

News Flash

आलिया- सिद्धार्थमध्ये पुन्हा बिनसलं?

दोघांमधील दुरावा अजूनही संपलेला नाही.

सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट

नवीन वर्षाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. मित्रमैत्रिणींना, सहकाऱ्यांना भेटवस्तू देत अनेकांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री आलिया भट्टनेही इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींना पर्यावरण जपण्याचा संदेश देत अनोख्या भेटवस्तू पाठवल्या. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटच्या वृत्तानुसार कतरिना कैफ, वरुण धवन, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, करण जोहर यांना भेटवस्तू पाठवल्या. पण, यात ती सिद्धार्थ मल्होत्राला मात्र विसरली. त्यामुळे पुन्हा एकदा आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आला की काय अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

आलियाने सर्वांना भेट म्हणून रोपटे दिले. त्या भेटवस्तूवर ‘कोएक्झिस्ट’ असा मेसेज लिहिला होता. ‘कोएक्झिस्ट’ ही भटक्या कुत्र्यांसंदर्भातील एक मोहिम असून आलिया या मोहिमेचा भाग आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत आपली मोहित कलाकार मित्रमंडळींप्रयंत पोहोचवण्यासाठी म्हणूनच तिने हा मार्ग निवडला असावा. पण, इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींना भेटवस्तू पाठवताना तिने सिद्धार्थला मात्र वगळले त्यामुळे आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या आलिया- सिद्धार्थच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. त्यानंतर दिवाळी पार्टीत दोघांना पुन्हा एकत्र पाहिलं गेलं.

View this post on Instagram

I like me better when I’m with youu 💕

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt) on

New Year 2018 : जाणून घ्या, बॉलिवूड कलाकारांचे नव्या वर्षातील संकल्प

जॅकलिन फर्नांडिसमुळे आलिया आणि सिद्धार्थमध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात होतं. तर सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्यामुळे आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यामध्ये ‘कोल्ड वॉर’ सुरु होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 5:28 pm

Web Title: everything is not right between alia bhatt and sidharth malhotra
Next Stories
1 गरोदरपणाविषयी विद्या काय म्हणतेय ऐकलं का?
2 ‘विरुष्का’लाही ५०% डिस्काऊंटचा मोह
3 VIDEO: बँकॉकमध्ये गर्लफ्रेंडसोबत राजकुमारचा ‘जुम्मा-चुम्मा’ डान्स व्हायरल
Just Now!
X