News Flash

‘बिग बॉस ८’मध्ये दिसू शकतात हे चेहरे

'बिग बॉस'चा प्रत्येक सिझन हा चर्चेचा विषय ठरतो. त्यात सहभागी होणारे स्पर्धक एकतर कुठच्या न कुठच्या वादात आधीच अडकलेले असतात नाहीतर बिग बॉसमध्ये तरी येऊन

| July 11, 2014 02:17 am

‘बिग बॉस’चा प्रत्येक सिझन हा चर्चेचा विषय ठरतो. त्यात सहभागी होणारे स्पर्धक एकतर कुठच्या न कुठच्या वादात आधीच अडकलेले असतात नाहीतर बिग बॉसमध्ये तरी येऊन वाद निर्माण करतात. त्यामुळे प्रेक्षकांना पुरेपुर गॉसिपची संधी या रिअॅलिटी शोमुळे मिळते. त्यातून या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करतो म्हणजे त्याचा चाहता वर्ग तर आणखीनचं उत्सुक असतो. मात्र, गेल्या पर्वातील स्पर्धकांच्या वागण्यामुळे कंटाळलेला सलमान यंदाच्या सिझनचे सूत्रसंचालन करेल का याबाबत शंकाच आहे. सलमान आठव्या सिझनमध्ये दिसेल का हे माहित नाही पण काही चर्चेत राहणारे चेहरे बिग बॉसमध्ये स्पर्धकांच्या रुपात दिसू शकतात. त्यांची नावे काही अशी आहेत.
१. आलोकनाथ- ट्विटरकरांच्या निशाण्यावर असलेले नाव म्हणजे आलोकनाथ उर्फ बाबूजी. संस्कारांवरून आलोकनाथ यांच्यावर अनेक विनोद फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट केले जातात. त्यांच्या याच प्रसिद्धीमुळे ते बिग बॉसमध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे.
२. लुलिया वेंतूर- सलमानची तथाकथित प्रेयसी लुलिया वेंतुर हीदेखील बिग बॉस ८मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
३. शांति डायनामाइट- शांति ही एक पॉर्नस्टार असून, ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातमीने तिने अनेकांचे लक्ष्य वेधले होते. सनी लिओनीनंतर आता बिग बॉसमध्ये येणारी दुसरी पॉर्नस्टार असेल. लोकांसमोर प्रसिद्धी मिळवण्याची संधी शांति सोडेल असे वाटत नाही.
४. पूनम पांडे- बिग बॉसच्या गेल्या सिझनपासूनच पूनम यात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव तसे होऊ शकले नाही. पण यावेळेस पूनम तिच्या चाहत्यांची निराशा करेल असे वाटत नाही.
५. शिवाजी साठम- ‘कुछ तो गडबड है’ या आपल्या संवादाने लाखो घरांमध्ये प्रसिद्ध असेलेले अभिनेता म्हणजे शिवाजी साठम. सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेने गेले कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे शिवाजी साठम यंदाच्या बिग बॉस स्पर्धकांच्या लिस्टमधील सर्वाधिक अपेक्षित नावांमधील एक आहेत.
६. सुनील ग्रोवर- कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील गुत्थीच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता म्हणजे सुनील ग्रोवर. कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील आणखीनच चर्चेत राहिला होता.
७. डेनियल वीबर- पॉर्नस्टार आणि नंतर अभिनयाकडे वळलेल्या सनी लिओनीचा नवरा डेनियल विबर हा देखील बिग बॉसमध्ये दिसू शकतो.
८. यो यो हनी सिंग- आपल्या रॅप संगीताने अनेकांना थिरकायला लावणारा हनी सिंग काही वादात्मक वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2014 2:17 am

Web Title: expected contestant in bigg boss 8
Next Stories
1 टि्वटर, फेसबुक वापरणाऱयांना कामधंदा असतो की नाही – सलमानला प्रश्न
2 ऐश्वर्याचा हिरो जॉन!
3 कमाल खानचे कपिल शर्माला आव्हान
Just Now!
X