18 September 2020

News Flash

प्रसिद्ध अभिनेत्री आशू यांचे निधन

आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ नाटकात त्यांनी किशोरी ही व्यक्तिरेखा साकारली होती.

(संग्रहित छायाचित्र)

मराठी रंगभूमीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकातील ‘रश्मी’च्या भूमिकेने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री ललिता देसाई तथा आशू यांचे (वय ७५) किडनीच्या विकाराने बुधवारी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (१७ सप्टेंबर) वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ललिता देसाई यांचा जन्म २१ जानेवारी १९४५ रोजी झाला. आचार्य अत्रे यांच्या ‘ब्रह्मचारी’ नाटकात त्यांनी किशोरी ही व्यक्तिरेखा साकारली होती. अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ नाटकातील अवखळ रश्मीच्या भूमिकेने त्यांना अमाप लोकप्रियता लाभली. ‘गुंतता हदय हे’, ‘नाथ हा माझा’, ‘अपराध मीच  केला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘अभिलाषा’, ‘मॅडम’ या नाटकांतून त्यांनी काम केले.

मराठी रंगभूमीबरोबरच त्यांनी ‘कब, क्यों और कहा’, ‘अमर प्रेम’, ‘संतान’, ‘सीता और गीता’, ‘यादो की बारात’ या हिंदी चित्रपटातून त्या रूपेरी पडद्यावर झळकल्या. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना अखिल भारतीय नाटय़ परिषद पुणे शाखेकडून ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:00 am

Web Title: famous actress ashu passes away abn 97
Next Stories
1 जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचे सडेतोड उत्तर
2 करण जोहरच्या घरी ड्रग्स पार्टीचं आयोजन? माजी आमदारानं NCB कडे केली तक्रार
3 ‘इंदू की जवानी’मधलं पहिलं गाणं रिलिज
Just Now!
X