21 January 2021

News Flash

फराह खानला डॉक्टरांनी दिला क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला; जाणून घ्या कारण…

फराह खानचा करोना रिपोर्ट आला समोर

करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अगदी लॉकडाउन जारी करुनही करोनाचा फैलाव अद्याप थांबलेला नाही. जवळपास ११ हजार लोकांना करोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीपर्यंत समाजातील सर्व स्थरातील लोक आहेत. या यादीत आता आणखी एक सेलिब्रिटीचे नाव जोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक संजय खान यांनी मुलगी फराह खान अली हिने देखील करोना चाचणी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी फराह खानच्या घरात करोनाग्रस्त रुग्ण सापडला होता. त्यामुळे घरातील सर्वांचीच करोना चाचणी घेण्यात आली आहे. फराहच्या पहिल्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र तरीही २९ एप्रिलपर्यंत तिला डॉक्टरांनी क्वारंटाईनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला आहे. फराहने ट्विट करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

फराह सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसते. या बिनधास्त शैलीमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. फराहचे हे ट्विट देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. काही जणांनी तिला स्वत:ची काळजी घेण्यासही सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 5:07 pm

Web Title: farah khan ali coronavirus test report came negative mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनच्या काळात सेहवाग पाहतोय ‘ही’ पौराणिक मालिका
2 Video : ‘.. तो जिंदा हो तुम’; कवितेतून फरहान अख्तरने दिला संदेश
3 VIDEO : नाराज मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आले घरी
Just Now!
X