News Flash

पुढील तीन वर्षात गोव्यात येणार फिल्मसिटीः गोवा राज्य सरकार

पुढील तीन वर्षांमध्ये गोव्यात फिल्मसिटी होणार असल्याचे गोवा राज्य शासनाने सांगितले आहे. "आम्ही गोव्यात फिल्मसिटी चालू करण्याची योजना करत आहोत. मात्र, गेल्या वर्षी काही आर्थिक

| July 1, 2013 12:26 pm

पुढील तीन वर्षांमध्ये गोव्यात फिल्मसिटी होणार असल्याचे गोवा राज्य शासनाने सांगितले आहे. “आम्ही गोव्यात फिल्मसिटी चालू करण्याची योजना करत आहोत. मात्र, गेल्या वर्षी काही आर्थिक संकटांमुळे फिल्मसिटीचे काम सुरु करु शकलो नाही”, असे गोव्याच्या मनोरंजन संस्थेचे (ESG) उपाध्यक्ष विष्णू वाघ म्हणाले. ‘सहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव’ सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळेस ते बोलत होते.
गोवा सरकारच्यावतीने मी वचन देतो येथे तीन-चार वर्षात नक्कीच फिल्मसिटी असेल, असे पर्यटन मंत्री दिलीप परुलेकर यांच्या उपस्थितीत वाघ म्हणाले. गोव्याला चित्रपट निर्मितीचे मुख्य केंद्र बनविण्याचा आमचा उद्देश्य आहे, असेही ते म्हणाले. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पोस्टकार्ड’ चित्रपटाने या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवाचा सोमवारी शेवट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2013 12:26 pm

Web Title: film city to come up in goa in next three years govt
Next Stories
1 ब्रिटीश अभिनेता आर्ट मलिक मिल्खा यांच्या वडिलांच्या भूमिकेत
2 बंगाली साहित्यावर चित्रपट करण्यास मधुर भांडारकर उत्सुक
3 अमिताभ बच्चननी आराध्याला नेले चाह्त्यांच्या भेटीस
Just Now!
X