27 February 2021

News Flash

PHOTO : ‘केसरी’मधील अक्षयचा थक्क करणारा लूक पाहिला का?

पूर्ण फोटो पाहून खिलाडी कुमारचं कौतुकच कराल

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार यंदाचे वर्ष गाजवणार यात वादच नाही. कारण, त्याच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या चर्चा थांबत नाहीत तोच ‘केसरी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खुद्द अक्षयनेच सोशल मीडियावर या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने सोबत लिहिलेलं कॅप्शनही अनेकांनाच त्याचे कौतुक करण्यास भाग पाडतेय.

‘यावेळी माझ्या मनात प्रचंड अभिमानाशिवाय इतर कोणतीच भावना नाही. या वर्षाची सुरुवाक मी ‘केसरी’ने करतोय. आतापर्यंतच्या माझ्या सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे’, असे कॅप्शन लिहित अक्षयने हा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तो शीख सैनिकाच्या रुपात दिसतोय. अस्सल शीख लूकमध्ये दिसणाऱ्या अक्षयच्या चेहऱ्यावर रुबाब आणि डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते.
एका वेगळ्याच रुपात दिसणाऱ्या या लूकमध्ये अक्षयच्या डोक्यावर भलीमोठी पगडी असून, त्याचा रंगही केसरी आहे. चित्रपटाच्या नावाच्या अनुशंगाने त्याचा हा लूक अगदी साजेसा आहे, असे म्हणायला हरकत नाही. करण जोहर आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करेल. २०१९ मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

सारागढीच्या युद्धाविषयी आजवर बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बरेच उल्लेख पाहायला मिळतात. १८९७ मध्ये ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये हे युद्ध झालं होतं. शौर्यगाथा, साहस आणि देशभक्ती यांचा मेळ साधत हा युद्धपट नेमका कसा असेल, याविषयीच आता चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 1:07 pm

Web Title: first look of bollywood actor akshay kumar starrer movie kesari dharma productions
Next Stories
1 सॅनिटरी नॅपकिन्सला आपलं म्हणा- अक्षय कुमार
2 मिशाचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांना मीराने फटकारले
3 २४ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल- डिंपल कपाडिया
Just Now!
X