News Flash

गश्मीरचे वेब विश्वात पदार्पण, लवकरच दिसणार या वेब सीरिजमध्ये

पाहा व्हिडीओ.

सध्या अनेक कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचे दिसत आहे. तसेच सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अनेक नवे चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी वेब विश्वात पदार्पण करत आहे. त्याच्या आगामी सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

गश्मीरच्या आगामी वेब सीरिजचे नाव ‘सर्जिकल ऑपरेशन टीम’ (SOT) असे आहे. नुकताच या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

हा टीझर शेअर करत त्याने ‘मेरी लाईफ का एक ही फंडा है. नो रुल्स नो कमिटमेंट.. ओनली अॅडजस्टमेंट’ हा सीरिजमधला डॉयलॉग कॅप्शनमध्ये लिहिला आहे. तसेच ‘माझ्या आगामी “SOT” या पहिल्यावहिल्या वेब सीरिजमधील काही खास दृश्य’ असे त्याने म्हटले आहे. आता चाहत्यांमध्ये या सीरिजबाबत उत्सुकता वाढली आहे. पण ही सीरिज केव्हा प्रदर्शित होणार हे अद्याप समोर आलेलं नाही.

सध्या गश्मीर कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्याची ही वेब सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित होणार आहे. तसेच गश्मीर लवकरच मराठी चित्रपट ‘सर सेनापती हंबीरराव’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 8:20 pm

Web Title: first look of gashmeer mahajanis upcoming web series avb 95
Next Stories
1 ‘या’ कलाकारांनी टाकला चिनी वस्तूंवर बहिष्कार
2 “या चीनचं काहीतरी करा”; रिचा चड्ढाने केली अमित शाहांवर टीका
3 एकता कपूरने केला भारतीय सैनिकांचा अपमान?; ‘हिंदुस्तानी भाऊ’ने केली पोलीस तक्रार
Just Now!
X