24 February 2019

News Flash

अथक प्रयत्नानंतर असा झाला रणबीरचा ‘संजू’

‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरने अथक मेहनत घेतल्याचे समजत आहे.

संजू

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘संजू’चा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली असून संजय आणि रणबीरचे चाहते आतुरतेने चित्रपट प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.  प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील ट्रेलरमध्ये रणबीर हुबेहुब संजयसारखा दिसून येत आहे. त्यामुळे ‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरने अथक मेहनत घेतल्याचे समजत आहे.

‘संजू’चा ट्रेलर, टीझर आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यातील रणबीरचा लूक पाहून अनेक वेळा आपण संजयलाच पाहत असल्याचा भास निर्माण होतो. मात्र हा ‘संजू’ साकारण्यासाठी रणबीरला फार खस्ता खाव्या लागल्याचं दिसून येत आहे. यासाठी त्याला त्याची चालण्या-बोलण्याची पद्धत, वेशभूषा बदलावी लागली. इतकंच नाही तर रणबीरला त्याचं वजनही कमी करावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.

‘संजू’मधल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रणबीरने शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. यात त्याने काही वेळा वजन वाढवलं तर काही वेळा ते घटवलंदेखील. संजयच्या आयुष्यातील एक एक टप्पा पार पाडण्यासाठी रणबीरला स्वत:मध्ये शारीरिक,मानसिक बदल करावे लागले होते.यातीलच एक भाग म्हणून संजय दत्तच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ रंगविण्यासाठी रणबीरला त्याचं वजन कमी करावं लागलं होतं.

सुरुवातीच्या काळात रणबीरने त्यांच १० किलो वजन कमी केलं तर संजयच्या आयुष्यातील पुढील दृश्य रंगवण्यासाठी त्याला पुन्हा एकदा वजन वाढवावं लागलं. १० किलो वजन कमी केलेल्या रणबीरने पुन्हा एकदा मेहनत घेत १५ किलो वजन वाढविलं. वजन कमी-जास्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला तासनतास जीममध्ये घाम गाळावा लागला होता. हा घाम गाळल्यानंतर रणबीर ख-या अर्थाने हुबेहुब संजू साकारु शकला.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’मध्ये रणबीरबरोबर मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर ही स्टारकास्ट स्क्रिन शेअर करणार आहेत. बहुचर्चित ठरलेला हा चित्रपट येत्या २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 13, 2018 6:07 pm

Web Title: for sanju movie ranbir kapoor loses his 10kg weight and then increase 15 kg