News Flash

बाहुबली फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?

कपिलने प्रभासची तोंडओळख करुन देताना त्याचे पूर्ण घेतले आहे

प्रभास

‘बाहुबली’ चित्रपटानंतर संपूर्ण जगभरात रातोरात लोकप्रिय झालेला अभिनेत म्हणजे प्रभास. लवकरच प्रभास ‘साहो’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी त्याचा ‘साहो’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रभास ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचला होता. दरम्यान या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माने प्रभासचे खरे नाव सांगितले आहे.

‘साहो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि प्रभास ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचलो होते. दरम्यान कपिलने प्रभासची तोंडओळख करुन देताना प्रभासचे पूर्ण घेतले आहे. ‘व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पालपती’ असे नाव कपिलने घेतले. हे नाव ऐकताच ही व्यक्ती कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण प्रभासची एण्ट्री होताच सर्व चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून मोठ्या आनंदाने प्रभासचे स्वागत केले.

या शोमध्ये प्रभास आणि श्रद्धाने त्यांच्या वैयक्तिक तसेच खाजगी आयुष्यातीलही काही गोष्टी शेअर केल्या. कपिलने देखील त्या दोघांची थट्टा मस्करी केली. या चित्रपटातून श्रद्धा कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान या चित्रपटासाठी श्रद्धाने ७ कोटी रुपयांचे मानधन घेतल्याचे म्हटले जात आहे.या चित्रपटाद्वारे प्रभास व श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. त्याचसोबत नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर हे कलाकार देखील चित्रपटात झळकणार आहेत. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली होती. या टीमने प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले होते. येत्या ३० ऑगस्ट रोजी हा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 1:10 pm

Web Title: full name of south superstar prabhas avb 95
Next Stories
1 ”दिग्दर्शक वारंवार हॉटेलमध्ये बोलवत होता,” विद्या बालनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
2 रानू मंडल यांना हिमेशने दिलेल्या मानधनाची रक्कम ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
3 नेहा धूपियाने लग्नाआधी केलं होतं ‘या’ तिघांना डेट
Just Now!
X