स्टारकिड्स हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. सैफ अली खानचा मुलगा तैमुरपासून ते अगदी महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवापर्यंतच्या स्टारकिड्सचे फोटो टिपण्यासाठी फोटोग्राफर्स नेहमीच तयार असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच स्टारकिड्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील दोन मुलं ही अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांची आहेत. राहील आणि रियान अशी रितेशच्या मुलांची नावं आहेत. या व्हिडीओद्वारे दोघांनी नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

रितेश आणि जेनेलिया आपल्या मुलांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर राहील आणि रियान यांनी जेव्हा समोर फोटोग्राफर्सना पाहिलं तेव्हा दोघांनीही हात जोडून त्यांना नमस्कार केला. रितेशच्या मुलांचा हा अंदाज पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या मुलांना दिलेल्या संस्काराचे दर्शन या व्हिडीओतून घडत असल्याची प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर पुढे जाऊन ही मुलं राजकारणात आपल्या आजोबांसारखं मोठं नाव कमावतील असं एकाने म्हटलंय.

नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश-जेनेलियाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. बॉलीवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते.