News Flash

करोनामुक्तीनंतर न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी प्रदर्शित होणार अजय देवगणचा ‘हा’ चित्रपट

न्यूझीलंडमध्ये २५ जून पासून चित्रपटगृहे पुन्हा उघडणार आहेत

बॉलिवूड चित्रपटांची लोकप्रियता साता समुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडमधील आता एक चित्रपट परदेशात प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. दिग्दर्शक रोहीत शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट न्यूझीलंडमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे दिसत आहे. नुकताच रोहितने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली होती.

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘न्यूझीलंड सरकारने चित्रपटगृहांमध्ये गोलमाल अगेन पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पहिला हिंदी चित्रपट आहे जो करोनाशी लढा दिल्यानंतर न्यूझीलंडमधील चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे’ असे म्हटले आहे.

आता न्यूझीलंड करोनामुक्त झाला आहे आणि तेथे चित्रपटगृहे पुन्हा उघडण्यात येणार आहेत. खास गोष्ट म्हणजे न्यूझीलंडमधील चित्रपट गृहे उघडताना अजय देवगणचा गोलमाल अगेन हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याने सर्वजण आनंदी आहेत. २५ जून रोजी हा चित्रपट न्यूझीलंडच्या चित्रपट गृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे.

‘गोलमाल अगेन’ हा बॉलिवूडमधील एक हॉरर कॉमेडीचा तडका असलेला चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, अर्शद वासरी, परिणीती चोप्रा, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर प्रकाश राज, निल नितीन मुकेश, जॉनी लिवर, मुकेश तिवारी, संजय मिश्रा, मुरली शर्मा, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर आणि सचिन खेडेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

golmaal again to re-release in covid 19 free new zealand avb 95

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 2:16 pm

Web Title: golmaal again to re release in covid 19 free new zealand avb 95
Next Stories
1 “उद्या तुमच्या मुलांना इंडस्ट्रीत येऊ देणार नाही का?”; घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना सोनी राजदान यांचा सवाल
2 सुशांतचा फजसोबत गोविंदाच्या गाण्यावर डान्स; व्हायरल होतोय व्हिडीओ
3 ‘सुशांतचा आधार न घेता घराणेशाहीला विरोध करा’; इरफान खानच्या मुलाने केलं आवाहन
Just Now!
X