दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस. रजनीकांत यांचे जगभरामध्ये असंख्य चाहते आहेत. रजनीकांत हे केवळ कलाकार नसून तामिळ चित्रपटातील ते एक दैवी नाव आहे. पडद्यावरील त्यांची स्टाइल, त्याचा ऍटिट्यूड यांनी वेडावलेल्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. रजनीकांत यांनी पहिल्यांदा १९७५ मध्ये आलेल्या ‘अबूर्वा रांगणगल’ या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. त्यानंतर रजनीकांत नावाचे वादळच दाक्षिणात्य चित्रपटात आले जे आजतायगत घोंगावत आहे. दाक्षिणात्यसोबतच त्यांनी ब-याच हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. आतापर्यंत त्यानी दीडशेहूनही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘अंधा कानून’ हा त्यांचा पहिला चित्रपट. विशेष म्हणजे आजवरच्या कारकिर्दीत विविधांगी भूमिका करणाऱ्या रजनीकांत यांना लहानपणी एक विशेष भूमिका करायला फार आवडायची.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. मात्र अभिनयाची आवड असणाऱ्या रजनीकांत यांना एका दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच विविधांगी भूमिकाही केल्या. मात्र लहान असताना रजनीकांत यांना रावणाची भूमिका करायला प्रचंड आवडायचं. शाळेत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा रावणाची भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

Happy birthday my life my father… My everything!!

A post shared by Soundarya Rajinikanth (@soundaryaarajinikant) on

शाळेत असल्यापासून रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी शाळेत विविध नाटकांमध्ये काम केलं होतं. या नाटकांमध्ये त्यांनी बऱ्याच वेळा खलनायकाची भूमिका साकारली. त्यातही त्यांना रावणाची भूमिका करायला फार आवडायचं.

दरम्यान, रजनीकांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव असून देखील त्यांचं राहणीमान अत्यंत साध आहे. आजही ते चाहत्यांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागतात. त्यामुळेच त्यांचा चाहतावर्ग अफाट आहे. फिटनेसवर भर देणारे रजनीकांत रोज पहाटे ५ वाजता उठून ध्यानधारणा करतात. तसंच बॉइज गार्डन येथील घरात पूजा आणि ध्यानधारणेसाठी वास्तूशास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक खोली बनवून घेतली आहे. बऱ्याच वेळा ते या खोलीत ध्यानधारणा आणि प्रार्थना करण्यात आपला वेळ घालवतात असं म्हटलं जातं.