गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टॅन्कोलिच यांची चर्चा सुरु आहे. नताशा आणि हार्दिक लवकरच आई-बाबा होणार असून ही गोड बातमी हार्दिकने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिली. तेव्हापासून ही जोडी विशेष प्रकाशझोतात आली आहे. त्यातच आता नताशाच्या बेबीशॉवरचे फोटो समोर आले आहेत.
नताशाने अलिकडेच तिच्या बेबीशॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सध्या लॉकडाउन असल्यामुळे या जोडीने घरच्या घरीच नताशाचं बेबीशॉवर (डोहाळजेवण) केलं आहे. याचे काही फोटो शेअर करत, मी आणि हार्दिकने एकत्र मिळून एक मोठा प्रवास केला आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आम्ही फार आनंदित आहोत, असं कॅप्शन नताशाने या फोटोला दिलं आहे.
View this post on Instagram
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये नताशासाठी हार्दिकने खास घरं सजवलं आहे.तसंच फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील पाळीव श्वानदेखील दिसून येत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, १ जानेवारी २०२० ला हार्दिकने नताशासोबत साखरपुडा केला तेव्हापासून ती चर्चेत आली आहे. नताशा मूळची सर्बियन असून सध्या ती मुंबई-स्थित मॉडेल आहे. नताशा अभिनेत्री होण्यासाठी २०१२ साली मुंबईमध्ये आली. प्रसिद्ध संगीतकार बादशाहच्या ‘डीजेवाले बाबू’ या म्युझिक व्हिडीओमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली.