News Flash

‘त्या’ अफवांवर अभिषेकने दिला पू्र्णविराम

२०१६मध्ये 'हाऊसफुल्ल ३' हा त्याचा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला.

अभिषेक बच्चन याने दोन चित्रपटांमध्ये काम करत असल्याच्या वृत्तांना पूर्णविराम दिला आहे.

बॉलीवूडमधील ज्युनियर एबी म्हणजेच अभिषेक बच्चन याने दोन चित्रपटांमध्ये काम करत असल्याच्या वृत्तांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक हा ‘हेराफेरी’च्या सिरीजमधील ‘हेराफेरी ३’ मध्ये काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आपण ‘हेराफेरी ३’ आणि ‘धूम’ च्या चौथ्या सिक्वलमध्ये सध्या काम करत नसल्याचे अभिषेकने सांगितले.

फोटो गॅलरी: आराध्याची बर्थडे पार्टी 

अभिषेक म्हणाला की, मी ‘हेराफेरी ३’ मध्ये सध्या तरी काम करत नाहीये. तसेच, ‘धूम’च्या सिरीजमधील ‘धूम ४’चे बोलाल तर असा चित्रपट बनतच नाहीये. त्यामुळे त्यात मी काम करण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे तो म्हणाला की, ‘हेराफेरी’चा सिक्वल सध्या तरी बनत नाहीये. ‘धूम ४’मध्ये काम करण्याबाबत विचारले असता तो म्हणाला की, अजून तरी मला निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्राकडून यासंबंधीत फोन आलेला नाही. मला ‘धूम ४’ ची स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नाही. खरं तर आदित्य यावर काम करतोय का नाही तेसुद्धा मला माहित नाही. या सिरीजमधील दुसरा चित्रपट बनवणारे विक्टर आचार्य हे दुस-या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत.

‘धूम’ सिरीजमधील महत्त्वाचा चेहरा असलेला अभिषेक पहिल्यांदाच ‘हेराफेरी’च्या सिक्वलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. या आधी ‘हेराफेरी’च्या दोन्ही सिरीजमध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अभिषेकच्या यावर्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर २०१६मध्ये ‘हाऊसफुल्ल ३’ हा त्याचा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला. विनोदीपट असलेल्या या चित्रपटाच्या आधीच्या सिरीजमध्ये झळकलेले अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्याव्यतिरीक्त अभिषेक, जॅकलीन फर्नांडिस, लिसा रे आणि नर्गिस फाख्री यांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ठीकठाक कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 10:10 am

Web Title: hera pheri 3 dhoom 4 not happening right now abhishek bachchan
Next Stories
1 ‘तुमच्या प्रेमावरच मी उभी आहे’
2 मालिकेच्या चित्रीकरणासाठी नागाची हेळसांड!
3 ३५० कोटी रुपयांचा ‘रजनी’पट
Just Now!
X