17 November 2017

News Flash

PHOTO: …असा साजरा केला कतरिनाने तिचा वाढदिवस

सलमानने जेव्हा कतरिनाला पाहिले तेव्हा तो उठून तिच्याकडे गेला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 12:22 PM

कतरिना कैफ

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या कतरिना कैफचा नुकताच वाढदिवस झाला. काल न्यूयॉर्कमध्ये आयफा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. तिच्या वाढदिवसादिवशीच पुरस्कार सोहळा असल्यामुळे अख्खी सिनेसृष्टी तिथे उपस्थित होती. अर्थातच तिला सगळ्यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. पण तिचा हा वाढदिवस एका वेगळ्या कारणामुळेही लक्षात राहणारा ठरला ते म्हणजे तिने स्वतःसाठी थोडा वेळ काढत मैत्रिणींसोबत न्यूयॉर्कची सैर केली. तिच्या या खास दिवसाचे काही फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केले.

‘झोया, टायगर अभी जिंदा है…’, सलमानचा कतरिनाला दिलासा

Birthday cake from Disney . I just loveeee birthdays … Cake no. 3

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

आता कतरिनाचा वाढदिवस म्हटल्यावर सलमान खान तिच्यासाठी काही खास करणार नाही असं तर होणार नाहीच ना… सलमानने त्याच्या परफॉर्मन्समधून तिला एक अनोखं गिफ्ट दिलं. आयफा पुरस्कार सोहळ्यात परफॉर्म करत असताना त्याने एक गाणे खास कतरिनासाठी निवडले होते. डान्स करताना सलमान काही क्षण थांबला आणि कतरिनाकडे बोट दाखवून तो म्हणाला की, ‘झोया टायगर अभी जिंदा है’ सलमानचं हे विधान ऐकून उपस्थितांपैकी अनेकांचीच हृदय घायाळ झाली असतील यात काही शंका नाही.

New York birthdays 🎉

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

#aboutlastnight coz #girlsjustwannahavefun Happy Birthday #KatrinaKaif 🎈🎉🎂

A post shared by Yasmin Karachiwala (@yasminkarachiwala) on

कतरिनाला चांगलं वाटावं म्हणून सलमानने घेतलेली ही मेहनत नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पुरस्कार सोहळ्यादरम्यान पत्रकार परिषदेवेळीही सलमानने जेव्हा कतरिनाला पाहिले तेव्हा तो उठून तिच्याकडे गेला आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर गेल्या वर्षभरात सलमान कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गेला तरी तो तिथे कतरिनाचेच गोडवे गाताना दिसतो. उत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये सलमानसाठी कतरिना नेहमीच पहिल्या स्थानावर असते.

अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

First Published on July 17, 2017 12:22 pm

Web Title: here are the inside photos from katrina kaifs birthday party