26 January 2021

News Flash

‘बाहुबली’ प्रीक्वल वेब सीरिजमध्ये शिवगामीची भूमिका साकारणार ही मराठमोळी अभिनेत्री

या वेब सीरिजमध्ये माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा दाखवण्यात येणार आहे.

शिवगामीची भूमिका साकारणार ही मराठमोळी अभिनेत्री

‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता यावरील वेब सीरिज नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या वेब सीरिजमध्ये माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा दाखवण्यात येणार आहे. ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ असं या सीरिजचं नाव असून यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याची माहिती समोर आली आहे.

या प्रिक्वल सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता राहुल बोस स्कंददासाच्या भूमिकेत आहे. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांत अभिनेत्री रम्या कृष्णा यांनी शिवगामीची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमध्ये मृणाल ठाकूर, राहुल बोस यांच्यासोबतच अतुल कुलकर्णी, वकार शेख, जामील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्याही भूमिका आहेत.

आनंद निलकंठन यांच्या ‘द राइज ऑफ शिवगामी’ या कांदबरीवर आधारित ही सिरिज असणार आहे. कधी मृदू तर वेळ प्रसंगी काळजाचा दगड करून शासन करणाऱ्या या राजमातेचा सामान्य मुलगी ते सम्राज्ञी असा प्रवास या प्रिक्वलमधून पाहायला मिळणार आहे. एक बंडखोर मुलगी ते साम्राज्याची राजमाता असे शिवगामीचे अनेक पैलू यातून उलगडत जाणार आहे.

एकूण ९ भागांची ही वेबसिरिज असणार आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटातून अमरेंद्र बाहुबली, महेंद्र बाहुबली या दोघांच्या कथा पाहायला मिळल्या मात्र आता यातून माहिश्मती साम्राज्याच्या सम्राज्ञीची कधीही न ऐकलेली कहाणी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २; या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. एकट्या ‘बाहुबली २’ नं भारतात जवळपास ५०० कोटींचा गल्ला जमवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 9:23 am

Web Title: here is who will star in netflix baahubali before the beginning web series
Next Stories
1 ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या, अन्यथा खळ्ळ खटॅक: मनसेचा इशारा
2 चित्र रंजन : एका झंझावाताची सुरेख ‘लय’कथा
3 ‘महाठक’गिरी
Just Now!
X