News Flash

Video : ..तर सलमानला मी बोटीतून ढकलून देईन- आमिर

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर आमिरने हे उत्तर दिलं.

सलमान खान, आमिर खान

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचं सहावं पर्व सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये मोठमोठे कलाकार हजेरी लावतात. या कलाकारांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी उलगडल्या जातात. म्हणूनच या शोला तेवढीच लोकप्रियता आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये नुकतीच आमिर खानने अभिनेत्री मलायका अरोरासोबत हजेरी लावली. सध्या या एपिसोडच्या एक प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

या प्रोमोमध्ये मलायका आमिरला प्रश्न विचारत आहे. ‘जर एका बोटीत तुझ्यासोबत सलमान खान आणि शाहरुख खान असतील. पण त्या बोटीत तुझ्यासोबत एका व्यक्तीचीच जागा असेल तर तू कोणाला पाण्यात ढकलशील?,’ असं मलायकाने विचारलं. अर्थातच आमिरची पसंती सलमानला आहे की शाहरुखला असा हा थेट प्रश्न आहे. त्यावर आमिरने अत्यंत चतुराईने उत्तर दिलं की, ‘मी सलमानला बोटीतून ढकलून देईन कारण भाई तर कधी बुडत नाही. (क्युंकी भाई तो कभी डुबता नहीं)’ आमिरच्या या उत्तराने बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमानसुद्धा नक्कीच खूश होईल.

पाहा व्हिडिओ-

आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बिग बजेट चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिरसोबत अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 5:25 pm

Web Title: here is why aamir khan will throw salman khan out of boat watch video
Next Stories
1 अक्षयच्या पदरात तीन मोठे चित्रपट, ‘मिशन मंगल’मध्ये प्रमुख भूमिकेत
2 आयुषमानला खास दिवाळी भेट; ‘बधाई हो’ १०० कोटी पार
3 Video : ‘गॅटमॅट’ मधील रसिकाचं ‘हे’ गाणं ठरतंय सुपरहिट
Just Now!
X