05 March 2021

News Flash

PHOTO : राखी सावंतचे राम रहिमसोबत फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

खरंतर वाद आणि राखी सावंत हे जणू अजब समीकरणच झालेय.

राखी सावंत

एखादी घटना घडली आणि ती बॉलिवूडकरांच्या नजरेत आली नाही असे क्वचितच घडत असेल. काही दिवसांपूर्वीच ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरूमीत राम रहिमला बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. आश्रमातील दोन साध्वींच्या बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणात त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणाने राखी सावंतचेही लक्ष वेधलेय.

खरंतर वाद आणि राखी सावंत हे जणू अजब समीकरणच झालेय. वादग्रस्त विषयांचा वापर ती चर्चेत राहण्यासाठी करते हे काही वेगळे सांगायला नको. आता ही बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे.

वाचा : ‘खतरो के खिलाडी ८’ या तीन सेलिब्रिटींमध्ये होणार अंतिम टक्कर

बलात्कार प्रकरणात राम रहिम सध्या तुरुंगात आहे. याच पार्श्वभूमीवर राखी आणि तिचा भाऊ राकेश सावंत यांनी राम रहिमवर चित्रपट तयार करण्याचे ठरवले. या चित्रपटाला त्यांनी ‘अब होगा इंसाफ’ असे शीर्षक दिलेय. नुकतेच या चित्रपटातील ‘बेवफा आयटम’ गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. राखी चित्रपटात हनीप्रीत इंसाच्या तर रजा मुराद हे राम रहीम इंसा आणि एजाज खान तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. ‘बेवफा आयटम’ गाण्याच्या चित्रीकरणासाठी मोठा सेट उभारण्यात आला होता.

वाचा : ..म्हणून झरीनवर आली बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याची वेळ

राम रहिम आणि हनीप्रीतला अभिनयासह स्टेज परफॉर्मन्सचीसुद्धा आवड होती. आपली हीच आवड पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक चित्रपटांची निर्मितीही केली. ‘मेसेंजर ऑफ गॉड’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या कथेपासून दिग्दर्शनापर्यंत सर्व काम राम रहिमने स्वतःच केले. त्याच्या प्रत्येक कामात हनीप्रीत त्याला सहकार्य करायची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 4:31 pm

Web Title: honeypreet rakhi sawant started shooting for ram rahim movie
Next Stories
1 PHOTO : जब काजोल मेट युवराज सिंग
2 ‘तारक मेहता..’च्या सेटवर दयाबेनचा शेवटचा दिवस
3 वरुण धवन तेलगूमध्ये बोलतो तेव्हा…
Just Now!
X