News Flash

‘रामायण’ पुन्हा पडद्यावर; बिग बजेट चित्रपटात दीपिका-हृतिकची वर्णी

'रामायण' चित्रपटाचं बजेट ऐकून व्हाल थक्क

गेल्या काही काळापासून कलाविश्वात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. त्यातच प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना ‘रामायण’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं बजेट हे तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.

‘स्पॉट बॉय’नुसार, सध्या कलाविश्वात आणि सोशल मीडियावर मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ‘रामायण’ हा थ्रीडी चित्रपट असून याचं बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त आहे.

‘रामायण’ या चित्रपटात दीपिका पदुकोण सीतेची भूमिका साकारणार आहे. तर हृतिक रोशन प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा : फरहान अख्तरला दिलासा; ‘मिर्झापूर’ प्रकरणावर उच्च न्यायालयाने दिला निर्णय

दरम्यान, ‘रामायण’पूर्वी दीपिका आणि हृतिक ही जोडी ‘फायटर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट देशभक्तीपर आधारित असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 11:51 am

Web Title: hrithik roshan and deepika padukone front runners to play ram and sita in madhu mantenas ramayan ssj 93
Next Stories
1 फरहान अख्तरला दिलासा; ‘मिर्झापूर’ प्रकरणावर उच्च न्यायालयाने दिला निर्णय
2 कंगना रणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत
3 ‘या’ मालिकेतून दया येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X