बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरले जात आहे. दरम्यान अभिनेता कमाल खानने हृतिक रोशनच्या चित्रपटातील एक क्लिप शेअर करुन बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. सुशांतच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
कमाल खानने एक हृतिक रोशनच्या काबिल या चित्रपटातील एक क्लिप पोस्ट केली आहे. या क्लिपमध्ये हृतिक “प्रत्येक आत्महत्येमागे एक हत्यारा लपलेला असतो. तो समोरच असतो पण कोणाला दिसत नाही.” असा डायलॉग बोलताना दिसतोय. ही क्लिप शेअर करुन सुशांतच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार हा प्रश्न त्याने संजय गुप्ता, हृतिक आणि राकेश रोशन यांना विचारला आहे.
How true are these lines today? @_SanjayGupta @iHrithik @RakeshRoshan_N! pic.twitter.com/DeAudgMdaY
— KRK (@kamaalrkhan) June 17, 2020
कमाल खान सोशल मीडियाद्वारे नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओमुळे काही जणांनी कमालवर टीका देखील केली आहे.