22 September 2020

News Flash

आयटम साँग करण्यास विद्याचा नकार

अभिनेत्री विद्या बालनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘फरारी कि सवारी’ या चित्रपटात आयटम साँग केले होते.

| June 16, 2014 02:59 am

अभिनेत्री विद्या बालनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘फरारी कि सवारी’ या चित्रपटात आयटम साँग केले होते. या चित्रपटातील विद्याचे ‘मला जाऊ द्या’ आयटम साँग चांगलेच हिट झाले. मात्र, आयटम साँग करताना कसलीही मजा येत नाही असे कारण देत विद्याने चक्क आयटम साँगसाठी नकार दिला आहे.
३६ वर्षीय विद्याने नुकतेच तिच्या आगामी चित्रपट बॉबी जासूस चित्रपटाच्या प्रमोशनकरिता ब्लॉग लाँच केला. या ब्लॉगचे नाव बॉबी को सब मालून है असे आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान भविष्यात विद्या आयटम साँग करणार का असे विचारले असता ती म्हणाली की, नाही. आयटम साँगमध्ये मला मजा येत नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही मला आयटम साँगमध्ये पाहू शकणार नाही.
दिया मिर्झाची निर्मिती असलेला ‘बॉबी जासूस’ ४ जुलैला प्रदर्शित होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 2:59 am

Web Title: i will not do item numbers vidya balan
Next Stories
1 चौकटीबाहेरचा ‘चिवित्र’ मनोरंजक
2 मराठमोळी झुंज गणपतीपुळ्यात संपणार
3 यू ही गाते रहो..
Just Now!
X