01 October 2020

News Flash

इम्रान-अवंतिका नात्याला देणार पुन्हा संधी; घेतला एकत्र येण्याचा निर्णय?

मध्यंतरी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या

‘जाने तू या जाने ना’, ‘डेल्ली बेल्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मध्यंतरी चांगल्याच रंगल्या होत्या. दोघांमध्ये मतभेद असल्यामुळे त्यांनी ९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र आता या दोघांचे विचार बदलले असून त्यांनी त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

अवंतिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून इम्रान आणि ती नात्याला नवीन संधी देणार असल्याचे कल्पना येत आहे. अवंतिकाने तिच्या लेकीसोबत इमारासोबत एक फोटो शेअर केला असून त्याला ब्लॅक अॅण्ड व्हाइट इफेक्ट दिला आहे.

“मी माझ्या प्रेमासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिरस्काराचं ओझं वाहून नेणं फार कठीण असतं – मार्टिन लूथर किंग ज्युनिअर. ज्या वेळी माझ्यावर जगात कोणावर विश्वास ठेवण्याची वेळ आली होती त्यावेळी मला ब्रह्मांडने मला खूनावलं होतं…जादू!”, असं कॅप्शन अवंतिकाने या फोटोला दिलं आहे. तिचं हे कॅप्शन पाहून तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, काही काळापूर्वी अवंतिकाने एक पोस्ट शेअर केली होती. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर तिच्या आणि इम्रानमध्ये काही तरी खटके उडत असल्याचं साऱ्यांच्या लक्षात आलं होतं. इतकंच नाही तर मध्यंतरी ती तिच्या लेकीसोबत माहेरीदेखील निघून गेली होती. त्यामुळे इम्रान आणि अवंतिकाच्या नात्या काही तरी अलबेल असून ते घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. २०११ मध्ये या दोघांनी लग्न केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 11:43 am

Web Title: imran khan and avantika malik planning to get back goes cryptic post about love ssj 93
Next Stories
1 “तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय का?” चाहत्याच्या प्रश्नावर अमिताभ म्हणाले…
2 ‘अकाऊंट पुन्हा चालू करणार नाही’; ट्विटरला अमेरिकी प्लॅटफॉर्म म्हणत रंगोलीने घेतला निर्णय
3 सर्वांत पहिला यशस्वी सर्जिकल स्ट्राइक; रामायणात रावणाच्या वधानंतर मीम्सना उधाण
Just Now!
X