04 March 2021

News Flash

कुठे कुठे जायचं शूटिंगला..

अंगावर कधी पिवळी, कधी पांढरी साडी लपेटून मै तेरी चांदनी..

शुभ्रधवल अशी हिमशिखरं आणि त्यात केवळ अंगावर कधी पिवळी, कधी पांढरी साडी लपेटून मै तेरी चांदनी.. म्हणत नाचणाऱ्या श्रीदेवीला पाहून हिला थंडी कशी भरली नाही, वगैरे प्रश्न तुम्हाला पडले असतील. पण तसे सगळ्यांनाच पडले असं नाही. अनेकांना श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांच्या गाण्या-नाचण्या पलीकडून डोकावणारी आल्प्स पर्वतराजी भुरळ घालून गेली. बॉलीवूडच्या तत्कालीन नायक-नायिकांचा हा रोमान्स घडवणारी ही रम्य स्थळं, बर्फाळ पर्वतराजीतही माधुरी किंवा श्रीदेवीच्या साडीचा पदर दूरवर उडवणारा हा वारा नेमका वाहतो कुठे हे जगाच्या नकाशावर शोधून काढायचा प्रयत्न आपल्या लोकांनी केला. इतकंच नाही तर ते तिथे जाऊन धडकलेही.. उगाच नाही स्वित्र्झलडची मंडळी यश चोप्रा आणि बॉलीवूड हे शब्द झोपेतही विसरत नाहीत. त्यांच्या गावाचं पर्यटन वाढवणाऱ्या बॉलीवूडसाठी आजही तिथे फु लांच्या पायघडय़ा अंथरल्या जातात.. अर्थात, फिल्म टुरिझम हा विषय आपल्याला नवीन नसला तरी इथे पुन्हा त्याचं माहात्म्य वर्णन करण्यासाठी निमित्त ठरलंय ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भारतभेट आणि त्यांनी खास बॉलीवूडजनांना शॉलोम बॉलीवूड म्हणत इस्रायलला येण्याचं दिलेलं आवतान..

बेंजामिन नेतान्याहू यांची भारतभेट अनेक गोष्टींसाठी खास ठरली असली तरी त्यांचं बॉलीवूड प्रेम आणि बॉलीवूडला तिथे येण्यासाठी त्यांनी दिलेलं जाहीर आमंत्रण हा सध्या खरोखच औत्सुक्याचा विषय ठरला आहे. गेल्या काही वर्षांत कधीकाळी फक्त युरोपमध्ये एखाददुसऱ्या गाण्यापुरती शूटिंग करणारा हिंदी सिनेमा आता दर चार चित्रपटांमागे वेगवेगळ्या देशांत पोहोचतो. जगाच्या नकाशाचा एकेक कोपरा पिंजून काढत तिथे शूटिंग करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं. एकीकडे मायदेशी आपला हिंदी चित्रपट आपल्या मातीचा किती, असा प्रश्न अनेकवेळा विचारूनही झाला असला आणि चर्चा करूनही थकला असला तरी दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या आगामी चित्रपटासाठी धर्मा प्रॉडक्शनची मंडळी तिथे केनियात पोहोचली होती. केनिया दिसायला सुंदर आहे म्हणून नव्हे तर तिथे भारतासारखं वातावरण असल्याने पूर्ण चित्रपट तिथे चित्रित केला जाऊ शकतो, या विचाराने ही मंडळी दक्षिण आफ्रिकेच्या प्रांतात येऊन पोहोचली होती. बॉलीवूडला चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी बाहेर जावंसं का वाटतं, या प्रश्नाचं साहजिक उत्तर चित्रपटांच्या फ्रेममध्ये दिसणारं निसर्गाचं वैविध्य हे आहे. मात्र त्यापलीकडे जात हिंदी चित्रपटांमधून दिसणाऱ्या आपल्या देशांच्या दर्शनामुळे त्या त्या देशांतलं पर्यटन वाढीला लागल्याचा साक्षात्कार अनेक देशांना झाला आहे. त्यामुळे केवळ बॉलीवूड नव्हे तर टॉलीवूड निर्मात्यांनीही आपल्याकडे येऊन चित्रीकरण करावं यासाठी अनेक देशांनी पॅकेजेस देण्यास सुरुवात केली आहे. इस्रायल हा या पंक्तीत दाखल झालेला नवा देश ठरणार आहे. शॉलोम बॉलीवूड या कार्यक्रमात खुद्द अमिताभ बच्चन यांच्यासमोर मी नि:शब्द झालो आहे, अशी कबुली देणाऱ्या नेतान्याहू यांनी बॉलीवूडचा जगभरात दबदबा आहे हेही जाहीरपणे सांगितले. त्याचाच फायदा इस्रायललाही व्हावा, पर्यटनवृद्धी आणि रोजगारनिर्मिती हे दोन उद्देश या आमंत्रणामागे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

इस्रायलचे सॉफ्टवेअर्स आणि आपले शो..

बॉलीवूड इस्रायलमध्ये पोहोचेल तेव्हा पोहोचेल मात्र तिथली तंत्रज्ञानात वाकबगार मंडळी आपल्या टेलिव्हिजन क्षेत्रात कधीच स्थिरावली आहेत. इस्रायलचे सॉफ्टवेअर्स वापरून काही रिअ‍ॅलिटी शो, मालिका आपल्याकडे निर्मिती केल्या गेल्या आहेत, अशी माहिती वायकॉमच्या राज नायक यांनी शॉलोम बॉलीवूड कार्यक्रमात गेल्या वर्षी आलेला टायगर श्रॉफचा ‘बागी’ थायलंडमध्ये चित्रित झाला. ‘शिवाय’साठी अजय देवगण बल्गेरियात पोहोचला. एवढंच नाही तिथलीच अभिनेत्री त्याची नायिकाही होती. सुपरफ्लॉप ठरलेला ‘राबता’ हंगेरी आणि बुडापेस्टमध्ये चित्रित झाला होता. त्याच्याही आधी ‘पीके’च्या गाण्यासाठी सुशांत सिंग राजपूत आणि अनुष्का शर्मा बेल्जियममध्ये सिटी ऑफ रोमान्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रजेसमध्ये दिसले. अनुराग बसूच्या ‘जग्गा जासूस’च्या करामती केपटाऊनमध्ये घडल्या. तर सध्या तीनशे कोटींच्या वर पोहोचलेल्या ‘टायगर जिंदा है’चा टायगरही अबुधाबी, मोरोक्को, ग्रीस आणि ऑस्ट्रिया एवढय़ा देशांतून फिरला आहे. आता हा परदेशी चित्रीकरणाचा बॉलीवूडी सिलसिला इतक्यात थांबणारा नाही. फिल्म टुरिझम ही संकल्पना बॉलीवूडमुळे इतर देशांसाठी खूपच फायदेशीर ठरली असल्याने नवनवे देश याचा उपयोग करून आपले पर्यटन वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. यातून आणखीही काही वेगळे प्रयोग आपल्या वाटय़ाला येतील मात्र घरबसल्या जग घुमिया..चा हा अनुभव भारतीय प्रेक्षकांसाठी नेत्रसुखद ठरणार आहे. तर अवघं जग मात्र थारे जैसा न कोई म्हणत बॉलीवूडच्या मागे उभं दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:58 am

Web Title: indian movies shooting in abroad
Next Stories
1 ‘उलट सुलट’ हृदय पिळवटणारी वेदना
2 स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘शतदा प्रेम करावे’
3 नार्कोजचे गँगवॉर
Just Now!
X