27 November 2020

News Flash

सलमानवर इंडस्ट्रीचे लागलेत ५०० कोटी

काळवीट शिकार प्रकरणात सलमना दोषी

सलमान खान

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरला आहे. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली असून, आजची रात्र त्याला कारागृहात घालवावी लागणार आहे. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २० वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणात सलमान खानला तुरुंगवास झाला तर आगामी प्रोजेक्ट्सवर लागलेले करोडो रुपये पाण्यात जातील. सलमान खान सध्या तीन चित्रपटांमध्ये व्यस्त असून, मिळालेल्या माहितीनुसार इंडस्ट्रीचे जवळपास ५०० कोटी रुपये त्याच्यावर लागले आहेत.

सलमान खान रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘रेस ३’, अली अब्बास जफरचा ‘भारत’ आणि होम प्रोडक्शन ‘दबंग 3’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यासोबतच सलमानचा टीव्ही शो ‘बिग बॉस’ आणि ‘दस का दम’ यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.

अॅक्शन फिल्म ‘रेस ३’
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘रेस ३’ गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टपासून ते शूटिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. या चित्रपटाचं बजेट १०० कोटी असून सलमान खान लीड रोलमध्ये आहे. चित्रपटाचं अर्ध्याहून जास्त शुटिंग झालं आहे. सलमानला तुरुंगवास झाला असता तर या चित्रपटाचं प्रचंड मोठं नुकसान झालं असतं.

इमोशनल ड्रामा ‘भारत’
अली अब्बार जाफर दिग्दर्शित करत असलेला भारत चित्रपटही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाच्या लोकेशनपासून ते प्रमुख अभिनेत्यांपर्यंत सर्व काही ठरलं आहे. सलमान खान प्रमुख भूमिकेत असणारा हा चित्रपट कोरिअन चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. जून महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे.

‘दबंग 3’
‘रेस ३’ चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सलमान खान ‘दबंग 3’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार होता. वर्षाअखेर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

याशिवाय सलमान खान टीव्ही शो ‘बिग बॉस’ आणि ‘दस का दम’ मध्ये सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 12:32 pm

Web Title: insdustry could have face loss of 500 crores if salman khan jailed
Next Stories
1 JIO धमाका ! मुंबईत FREE मध्ये मिळणार स्वप्नातलं घर, जिओची दमदार ऑफर
2 मी माझा पगार देणार नाही, स्वामींनी पक्षादेश धुडकावला
3 Blackbuck Poaching Verdict: काळवीट शिकार प्रकरणी सलमान ‘एकटा’ खलनायक
Just Now!
X