03 August 2020

News Flash

हा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम

'हा' बॉलिवूड अभिनेता पाहून आयर्नमॅनला आठवतात हॉलिवूड सुपरस्टार टॉम हँक्स

हॉलिवूड सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनियर भारतीय संस्कृतीचा प्रचंड मोठा फॅन आहे. त्याला जेव्हा कधी भारताबद्दल विचारलं जातं तेव्हा तो भारतीयांची तोंड भरुन स्तुती करतो. यावेळी त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. आमिर खान म्हणजे बॉलिवूडचा टॉम हँक्स असं तो म्हणाला. शिवाय आमिरसोबत काम करण्याची इच्छा देखील त्याने व्यक्त केली.

अवश्य पाहा – सलमानचं ‘सल्लू’ हे नाव कोणी ठेवलं?; भाईजानने सांगितला आपल्या नावाचा अजब किस्सा

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत आयर्नमॅन उर्फ आरडीजेने बॉलिवूड चित्रपटांवर भाष्य केलं. तो म्हणाला, “मी बॉलिवूड चित्रपट आवडीने पाहातो. परंतु त्यामध्ये मला आमिर खानचे चित्रपट जास्त आवडतात. ‘लगान’ हा चित्रपट पाहून मी त्याचा फॅन झालो. त्याने या चित्रपटात कमालीचा अभिनय केला आहे. त्याला पाहून मला टॉम हँक्स आठवतात. मी तर आमिरला बॉलिवूडचा टॉम हँक्सच म्हणेन. संधी मिळाली तर मला आमिरसोबत काम करायला नक्की आवडेल.”

अवश्य पाहा – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सलमानवर संशय? पोलिसांनी केली एक्स मॅनेजरची चौकशी

टॉम हँक्स हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेते म्हणून ओळखले जातात. ‘फॉरेस्ट गम्प’, ‘कास्ट अवे’, ‘कॅप्टन फिलिप्स’, ‘कॅच मी इफ यु कॅन’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांना आपल्या जबरदस्त अभिनयासाठी दोन वेळा ऑस्कर पुरस्कारानेही सन्मानित केले गेले आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी टॉम हँक्स यांची असते. असाच काहीसा प्रयत्न आमिर खान देखील करतो. त्यामुळे आयर्नमॅन आमिर खानला बॉलिवूडचा टॉम हँक्स म्हणतोय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 12:32 pm

Web Title: iron man robert downey jr called aamir khan the tom hanks of india mppg 94
Next Stories
1 ‘तुम्ही बरे व्हाल, मला विश्वास आहे’; बिग बींसाठी लता मंगेशकर यांचं ट्विट
2 सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सलमानवर संशय? पोलिसांनी केली एक्स मॅनेजरची चौकशी
3 बिग बींसाठी हेमा मालिनी यांनी केली प्रार्थना; म्हणाल्या…
Just Now!
X