News Flash

अभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न?

एका मुलाखतीत निकेशाने प्रभूदेवाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

प्रभूदेवा, निकेशा पटेल

गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेत्री निकेशा पटेल चांगलीच चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यामागे कारणंही तसंच आहे. एका मुलाखतीत तिने डान्स मास्टर आणि कोरिओग्राफर प्रभूदेवाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यामुळेच ती सध्या ट्रेण्ड होत आहे. प्रभूदेवा आणि निकेशा लग्न करतायत की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आणि सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आलं.

प्रभूदेवाशी लग्नाविषयीच्या चर्चा इतक्या झाल्या की निकेशाला त्याबद्दल विचारण्यासाठी अनेकांचे फोन आणि मेसेज येऊ लागले. या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अखेर निकेशाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘प्रभूदेवासोबत चित्रपटात काम करण्याविषयी तुम्ही मला विचारत आहात, पण माझा तर त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार आहे,’ असं ती म्हणाली होती. त्यावर स्पष्टीकरण देत निकेशाने ट्विट केलं की, ‘गेल्या काही दिवसांपासून मला येणाऱ्या सतत फोनकॉल्समुळे मी वैतागले आहे. प्रभूदेवा यांच्याशी मी लग्न करण्याच्या चर्चा खोट्या आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. मी कोणाशीच लग्न करत नाहीये. प्रभूदेवा माझे खूप चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना सर म्हणते.’

Rare Moment : जेव्हा साऊथचे त्रिमुर्ती एकत्र येतात..

निकेशाने तेलुगू, तामिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘तेरी मेहरबानियाँ २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हिंदी चित्रपटाचा हा सिक्वल असून तेलुगू आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. २०१० मध्ये प्रभूदेवाच्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 2:40 pm

Web Title: is prabhudeva getting married to south actress nikesha patel here is the truth
Next Stories
1 …म्हणून शाहरुखकडून १० लाख रुपये घेण्यास बिग बींचा नकार
2 ऋषी कपूर यांचं ट्विट रणबीर- आलियाच्या नात्यासंबंधी तर नाहीये ना?
3 Video: जॅकलिन फर्नांडिसनेही उडवली डेजी शहाची खिल्ली
Just Now!
X