01 March 2021

News Flash

शाहिदच्या चिमुकलीला भेटायला गेली आलिया

शाहिद कपूर सध्या त्याच्या मुलीसोबत जास्त वेळ घालवत आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

बी टाऊनचा ‘टॉमी सिंग’ म्हणजेच अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याच्या मुलीसोबत जास्त वेळ घालवत आहे. शाहिद आणि त्याची पत्नी मीरा राजपूत कपूर यांच्या जीवनात एका चिमुकलीचे आगमन झाले होते. त्यामुळे सध्या शाहिद आणि मीराच्या जीवनात आनंदी आनंद आहे असेच म्हणावे लागेल. नुकतेच शाहिदच्या ‘मीशा’ला भेटण्यासाठी बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने थेट त्याचे घर गाठले.

‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी सिंगापूरला जाण्यापूर्वी ‘उडता पंजाब’ फेम अभिनेत्री आलिया भट्टने शाहिदच्या घरी भेट दिली. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आलियाने शाहिदच्या मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण चित्रपटांच्या चित्रिकरणांमध्ये व्यग्र असल्यामुळे तिला हे शक्य होत नव्हते. पण, सरतेशवटी वेळात वेळ काढून आलियाने मीशाची भेट घेतलीच.

मीरा, शाहिद आणि आलिया यांच्या मैत्रीपूर्ण भेटीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. तसे पाहिले तर आलिया भट्ट आणि शाहिद कपूर हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. शाहिद नेहमीच त्याच्या चित्रपटांबद्दलची आणि वैयक्तिक जीवनाविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. ‘शानदार’ आणि ‘उडता पंजाब’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर अलिया आणि शाहिद यांच्यातील मैत्रीचे नाते आणखीनच दृढ झाले आहे. दरम्यान शाहिद लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 12:44 pm

Web Title: it might be first celebrity meet up for little one aalia bhatt visited shahid kapoors daughter misha
Next Stories
1 पाकिस्तानी कलाकारांना बंदी घातल्यानंतर करण, शाहरुखने केला नवा ‘प्लॅन’?
2 ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर अदनान सामीच्या पंतप्रधान आणि जवानांना शुभेच्छा
3 उरी हल्ल्यावर निषेध व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांचा नकार
Just Now!
X